झिरोच्या ट्रेलर लॉन्चनंतर शाहरुख खानच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे फोटोज गौरी खानने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात शाहरुख-गौरी, सुहाना आणि आर्यन ब्लॅक गोल्डन रंगाच्या ड्रेसेसमध्ये दिसत आहेत. फोटो शेअर करताना गौरीने लिहिले की, "Mood lighting this Diwali,"
या पार्टीत सुहाना आकर्षणाचे केंद्र ठरली. सुहानाने यात गोल्डन-ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान केला होता. सुहानाच्या ट्रेडीशनल लूकला ग्लॅमरस अंदाज होता.
पाहुया स्टार्सचे फोटोज...
या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली. गोल्डन आणि ब्लॅक ही पार्टीची थिम असल्यामुळे बॉलिवूडचे तारे गोल्डन आणि ब्लॅक पहेरावात पार्टीत अवतरले. काजोल, करण जोहर, आमिर खान, करिना कपूर, कतरिना कैफ, शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर, करिना कपूर यांसारखे स्टार्स पार्टीत उपस्थित होते.