दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांच्या चिमुकल्याची पहिली झलक सोशल मीडियामध्ये दिसली. शाहिद आणि मीरा कपूरचा चिमुकला झेन कपूर अवघ्या दोन महिन्यांचा आहे. यंदा झेनची पहिली भाऊबीज होती. त्यानिमित्त इंस्टाग्रामवर मीरा कपूरने शुक्रवारी रात्री झेनचा पहिला फोटो शेअर केला आहे. अनेकांना हा चिमुकला शाहिद कपूरची कॉपी असल्याच्या प्रतिक्रिया शेअर करण्यात आल्या आहेत.
मीरा आणि शाहिद कपूर यांची मोठी मुलगी मिशा कपूरचेही दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. मात्र यंदाची दिवाळी मिशा सोबतच कपूर कुटुंबियांसाठी झेनने खास बनवली आहे. झेनचा जन्म ५ सप्टेंबरला मुंबईत झाला. झेनच्या फोटोखाली मीराने हॅलो वर्ल्ड असं कॅप्शन दिले आहे.
सैफिनाचा तैमूर अली खान हा सोशल मीडियावर स्टार सेलिब्रिटी कीड आहे. जन्मापासूनच तैमूरचा प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. आता झेन कापूरचेही फोटो तशाच प्रकारे व्हायरल होत आहे.