Pathaan Worldwide Collection: शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर कमी होण्याचं नाव घेत नाही. चित्रपटगृहांमध्ये तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही चित्रपट अनेक ठिकाणी चांगली कमाई करत आहे. शाहरुख खानचे नाव जगभर ऐकू येत आहे. तिसर्या वीकेंडलाही या स्पाय युनिव्हर्स चित्रपटाने झेंडा रोवला आहे. किंग खानचा पठाण काही दिवसांतचं 1000 कोटींची कमाई करणार आहे.
शाहरुख खानचा चित्रपट वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिद्धार्थ आनंदचा अॅक्शन थ्रिलर 'पठाण' प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तिसऱ्या आठवड्यातच या चित्रपटाने 'दंगल', 'केजीएफ 2' सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत शाहरुख खानने आजही रुपेरी पडद्यावर आकर्षण असल्याचे सिद्ध केले. या वीकेंडला चित्रपटाने जगभरातील व्यवसायात 950 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. (हेही वाचा -Valentines Day Offer: रितेश, जेनेलिया यांचा 'वेड' पाहायला मिळणार फक्त 99 रुपयांत; जाणून घ्या खास कारण)
पठाण लवकरच 1000 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. वीकेंडला चित्रपट कमकुवत झाला असला तरी किती दिवसांत तो 50 कोटींचा टप्पा पार करेल हे सांगणे फार कठीण आहे. रविवारी, 12 फेब्रुवारीला चित्रपटाने 13 कोटींची कमाई केली. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पठाणचे कलेक्शन 511 कोटी रुपये झाले आहे. यासह पठाण हिंदी भाषेत बॉलीवूडचा सर्वात मोठा कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
पठाणसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तीन आठवडे पडद्यावर एकट्याने राज्य केलं. याकाळात कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या शुक्रवारी कार्तिक आर्यनच्या 'शेहजादा'सोबत, मार्वलचा अँट-मॅन आणि द वास्प: क्वांटो मॅनिया देखील प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपटाच्या रिलीजचा परिणाम शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावर होऊ शकतो. यानंतर अक्षय कुमारचा सेल्फी, रणबीर कपूर-श्रद्धा कपूरचा तू झुठी मैं मकर आणि तब्बू-अजय देवगणचा भोला यासह आणखी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.