Shah Rukh Khan (Photo Credits: Facebook SRK FanPage)

Jawan OTT Rights: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. रॉकेट्री आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या भूमिका केल्या असल्या तरी गेल्या काही वर्षांत त्याने एकही चित्रपट प्रदर्शित केलेला नाही. अशा परिस्थितीत शाहरुख 2023 मध्ये मोठा धमाका करण्याची योजना आखत आहे. कारण, पुढील वर्षी त्याचे जवान, पठाण आणि डंकी हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

शाहरुख खानने जवानचे ओटीटी आणि सॅटेलाइट अधिकार विकले आहेत. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच बंपर कमाई केली आहे. लेट्स सिनेमाने आपला खास रिपोर्ट ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, चित्रपटाचे हक्क मोठ्या किंमतीला विकले गेले आहेत. या चित्रपटाच्या डीलमधून शाहरुख खानने जेवढी कमाई केली आहे, तेवढ्यात आणखी दोन-तीन चित्रपट बनवता येतील. वृत्तानुसार, अॅटली दिग्दर्शित शाहरुख खानच्या 'जवान' या बिग बजेट चित्रपटाचे झी टीव्ही आणि ओटीटी राईट्स नेट्टफ्लिक्सने 250 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली जवान हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय सुनील ग्रोव्हर आणि विजय सेतुपती हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये 2 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. जवान हा एक थ्रिलर अ‍ॅक्शन चित्रपट असून, या चित्रपटात शाहरुख सैनिकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2023 मध्ये जवान व्यतिरिक्त शाहरुखकडे पठाण आणि डंकी हे आणखी दोन चित्रपट आहेत. पठाणमध्ये शाहरुख दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. त्याचवेळी डंकी चित्रपटात त्याच्यासोबत दंगल अभिनेत्री फातिमा सना शेख आहे.