‘सलमान खान फिल्म्स’ वर फसवणुकीचे गंभीर आरोप; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने पोलिसांत दाखल केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण
अंश अरोड़ा व सलमान खान (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) प्रॉडक्शन हाऊसवर (SKF) सलमान खान फिल्म्सवर, अभिनेता अंश अरोराने गंभीर आरोप केले आहेत. अंशला सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसमधून अनेक कॉल, मेसेजेस आणि ई-मेल आले आहेत. अंशच्या म्हणण्यानुसार, एका ईमेलमध्ये त्याला सलमान खानच्या पुढच्या टायगर जिंदा है 3 या चित्रपटात, नकारात्मक भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ऑडिशनसह दिग्दर्शक प्रभुदेवला भेटण्याबद्दलही नमूद केले आहे. यानंतर अंश अरोराने सलमान खान फिल्म्सविरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्यासोबत फसवणूक झाली असून, त्याच्या आगामी प्रकल्पांवरही त्याचा परिणाम झाला असल्याचे अंशचे म्हणणे आहे.

माझ्यासोबत जे घडले ते दुसर्‍या कोणासोबत होऊ नये म्हणून अंशने, अशा फसवणूक करणार्‍यांवर योग्य कारवाईची म्गणी केली आहे. सलमान खानने काही दिवसांपूर्वी एका ट्वीटमध्ये म्हटले होते की, ‘मी किंवा सलमान खान फिल्म्स दोघेही सध्या कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग करीत नाही. आम्ही आमच्या आगामी चित्रपटांसाठी कोणतेही कास्टिंग एजंट हायर केले नाही. या संदर्भात, आपल्याला कोणताही ईमेल किंवा संदेश मिळाल्यास, त्यावर विश्वास ठेवू नका. कोणी सलमान खान फिल्म्सचे नाव किंवा माझे नाव चुकीचे वापरत असल्यास त्याच्यवर कायदेशीर कारवाई केली जाईल.’ (हेही वाचा: धक्कादायक! टीव्ही अभिनेत्यावर पोलिसांचे अत्याचार; उपचारासाठी रुग्णालयात भरती (Photo)

या आरोपांसाठी अंशने काही मेल्सचा दाखला दिला आहे, ज्यामध्ये मार्च महिन्यात सलमान खान फिल्म्सकडून आपल्याला फोन व मेल्स आले असल्याचे सांगितले आहे. तो पुढे म्हणतो, 3 मार्च रोजी सलमान आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभू देवाबरोबर मिटिंगची चर्चा झाली होती, पण नंतर प्रभुदेवा व्यस्त असल्याचे सांगून ही बैठक रद्द केली. मात्र अचानक सलमानने ट्वीट करत कास्टिंग होत नसल्याचे सांगितले आहे, यावर अंशला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या सर्व प्रकारांमुळे त्याचे आगामी प्रकल्पही रखडले गेले. याच्बब्त आता त्याने पोलिसांकडे धाव घेतली आहे.