Inshallah movie announcement (Photo Credits: Twitter)

ईद आणि सलमानचा चित्रपट हे जणूच समीकरणच बनलय. त्यामुळे सलमानचे चाहते दरवर्षी ईद ची आर्वजून वाट पाहत असतात. नुकताच ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला 'भारत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसतोय. ही ईद होते न होते तोच पुढच्या वर्षी सलमान कोणता नवा ब्लॉकब्लस्टर सिनेमा घेऊन येतोय याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यांना चर्चांना पुर्णविराम देणारी बातमी म्हणजे 2020 ला सलमान 'इंशाअल्लाह' (Inshallah) हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात प्रथमच सलमान- आलिया ही जोडी झळकणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बल 19 वर्षानंतर दिग्दर्शक संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) आणि सलमान (Salman Khan) एकत्र काम करणार आहेत.

दिग्दर्शक संजयलीला भंसाळी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला 'इंशाअल्लाह' या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. आणि आता या चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt) ने या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा ट्विट केले आहे.

2020 मध्ये 'ईद'च्या मुहूर्तावर 'इंशाअल्लाह' चित्रपट प्रदर्शित करण्याचं आता निश्चित झालं आहे. सलमाननेही आलियासोबत काम करण्यासाठी आतुर असल्याचं म्हटलं होतं. आमची जोडी पडद्यावर चांगली दिसेल, असा विश्वासही सलमानने व्यक्त केलाय.

संजय लीला भंसाळी यांच्या 'Inshallah' मध्ये सलमान खान आणि आलिया भट्ट ही नवी रोमॅन्टिक जोडी झळकणार, ट्विटरवरून दिली चाहत्यांना खूषखबर

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 'इंशाअल्लाह' चित्रपटात सलमान 40 वर्षीय उद्योगपतीची तर आलिया भट्ट नुकतंच अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात केलेल्या 20 वर्षीय अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे.