Inshallah Cast (Photo Credits: Instagram)

हम दिल दे चुके सनम नंतर तब्बल 20 वर्षांनंतर सलमान खान (Salman Khan), संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) आणि रोमॅन्टिक सिनेमा हे त्रिकुट एकत्र जमलं आहे. आज सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत अधिकृत खुलासा करत चाहत्यांना खूषखबर दिली आहे. संजय लीला भंसाळी यांच्या आगामी सिनेमाचं नाव 'इन्शाअल्लाह' (Inshallah) आहे. तर सलमान खान या सिनेमामध्ये आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

काही दिवसांपासून सलमान आणि संजय लीला भंसाळी एकत्र काम करणार अशी चर्चा रंगली होती. कालच आलिया भट्टदेखील संजय लीला भंसाळीच्या ऑफिसमधून बाहेर पडताना मीडियाने टिपलं होतं. आज अखेर या सार्‍या वृत्तांवर शिक्कामोर्तब झालं आहे. सलमान खान आणि आलिया भट्ट या दोन्ही कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ('हम दिल दे चुके सनम' नंतर 19 वर्षांनी सलमान खान आणि संजय लीला भंसाळी पुन्हा Love Story साठी एकत्र )

 सलमान खान ट्विट  

संजयच्या आगामी सिनेमामध्ये परत काम करण्याची संधी अखेर मिळाली. 'इन्शाअल्लाह' आलिया सोबत काम करणार आहे आणि आमचा हा प्रवास आशादायी असेल असे ट्विट सलमान खानने केले आहे.

 आलिया भट्ट ट्विट  

सध्या सलमान खान 'भारत' आणि 'दबंग 3' या सिनेमामध्ये व्यस्त आहे. तर आलिया 'कलंक' सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.