अभिनेत्री समीरा रेड्डी हिच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन; समीराने शेअर केली पहिली झलक
Sameera Reddy (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) ही दुसऱ्यांना आई झाली आहे. शुक्रवार, 12 जुलै रोजी समीराला कनारत्न प्राप्त झाले. ही गोड बातमी खुद्द समीराने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. मुलीची खास झलकही तिने फोटोच्या माध्यमातून शेअर केली.

हा फोटो शेअर करत समीराने लिहिले की, "आज सकाळी आमच्या घरी एका लहान परीचं आगमन झालं आहे."

समीरा रेड्डी हिची पोस्ट:

View this post on Instagram

Our little angel came this morning 🌸My Baby girl ! Thank you for all the love and blessings ❤️🙏🏻 #blessed

A post shared by Sameera Reddy (@reddysameera) on

समीराने शेअर केलेल्या या गोड बातमीनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यापूर्वी समीराला एक लहान मुलगा आहे.

काही दिवसांपूर्वी समीरा अंडरवॉटर प्रेग्नंसी फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. समीराचं हे प्रेग्नंसी फोटोशूट सोशल मीडियात चांगलच गाजलं. 2002 मध्ये समीराने बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. त्याचबरोबर तिने तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली सिनेमातही काम केलं आहे. लग्नानंतर मात्र सिनेसृष्टीला बाय म्हणत समीरा संसारात रमली.