Sameer Wankhede Befitting Reply To Shah Rukh Khan: शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा जवान (Jawan) चित्रपट त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला. या चित्रपटात त्याने विक्रम राठोर नावाचे पात्र साकारले. यात शाहरुखचा एक डायलॉग आहे, 'बेटे को हाथ लगन से पहले...' आता या डायलॉगचा संबंध आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे प्रभारी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी लावला जात आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखचा मुलगा आर्यन याला ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, पण नंतर सर्व आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता या डायलॉगवर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जवानमधला हा डायलॉग अगदी ‘रोडसाइड’ असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं आहे.
MensXP शी संभाषणात, समीर वानखेडे यांना या संवादावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर ते म्हणाले, 'हा संवाद मला अगदी ‘रोडसाइड’ वाटतो. मी चित्रपट पाहत नाही आणि कोणतेही संवाद ऐकत नाही. मला या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही. पण जर कोणी माझ्यावर या गोष्टीचा निशाणा साधला असेल तर मी त्याला इंग्रजीत उत्तर देऊ इच्छितो. मी अनेक घरे आणि पूल जाळले आहेत आणि त्या जळलेल्या घरांवर आणि पुलांवर मी नाचलो आहे, त्यामुळे मला नरकाची भीती वाटत नाही, त्यामुळे कृपया मला घाबरू नका.' (हेही वाचा - Dunki Releasing Tomorrow: शाहरुख खानने तापसी पन्नूसोबत 'डंकी'चे पोस्टर केले शेअर,लोकांना तिकीट बुक करण्याची केली विनंती)
Sameer Wankhede reacts to SRK’s ‘Bete Ko Hath’ dialogue.
He calls this dialogue ‘roadside’.
His full reply : “I have burnt many houses and bridges and I have danced on those burnt houses and bridges so I fear no hell so please don’t scare me.” pic.twitter.com/TtOfLA6aYU
— News Arena India (@NewsArenaIndia) December 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)