Sam Bahadur: सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिक शीर्षकाची झाली घोषणा; 'सॅम बहादुर' चित्रपटात विकी कौशल साकारणार महत्त्वाची भूमिका
Vicky Kaushal (PC - Instagram)

Sam Bahadur: एक व्यक्ती, अनेक नावे, अशी ओळख असणाऱ्या सॅम मानेकशॉ (Sam Manekshaw) यांच्या जयंतीनिमित्त रॉनी स्क्रूवाला आणि मेघना गुलजार (Meghna Gulzar) यांनी विकी कौशल (Vicky Kaushal) स्टारर बायोपिकचे शीर्षक घोषित केले आहे. "सॅम बहादूर" असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. भारतातील महान युद्धवीर नायकांपैकी एक असलेल्या सॅम मानेकशाचा जन्म 3 एप्रिल 1914 मध्ये झाला होता. आज त्यांच्या जयंतीनिमित्त रॉनी स्क्रूवाला आणि चित्रपट निर्माते मेघना गुलजार यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शीर्षक 'सॅम बहादूर' जाहीर केले आहे.

सॅम बहादूर चित्रपटात विक्की कौशल बहादूर मानेकशा यांची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये विकीचा या चित्रपटातील लूक रिलीज झाला होता. त्यावेळी सॅम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. गेल्या वर्षी निर्मात्यांनी विक्की कौशलचा दुसरा लूक प्रदर्शित केला होता. ज्यात फिल्ड मार्शलसारख्या दिसणारा विक्कीच्या लूकने सर्वांना चकित केले होते. (वाचा - Ajay Devgn RRR Look: अजय देवगण चा ‘RRR’ लूक त्याच्या बर्थ डे दिवशी झाला रिलीज (Watch Video))

या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी सांगितलं की, 'सॅम हा एक सज्जन सैनिक होता. सॅम बहादूरसारखे पुरुष आता नाहीत. रॉनी स्क्रूवाला आणि सॅम यांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. फील्ड मार्शलच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बायोपिकचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

शीर्षक भूमिका साकारणाऱ्या विक्की कौशलने सांगितले की, 'मी नेहमी माझ्या आई-वडिलांकडून सॅम बहादूर यांच्या कथा ऐकल्या होत्या. त्यांनी 1971 चे युद्ध पाहिले आहे. पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. या चित्रपटात सॅम यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.'