सलमान खान स्वत:चे चॅनल काढणार, 'कपिल शर्मा शो'साठी मोठा निर्णय
अभिनेता सलमान खान (फोटो सौजन्य-Youtube)

बॉलिवूडमधील दबंग अशी ओळख असणारा सलमान खान (Salman Khan) एका अभिनेत्यासह यशस्वी व्यावसायिकसुद्धा आहे. तसेच विविध प्रोडक्ट्सचासुद्धा सलमान ब्रँन्ड अॅम्बॅसिटर आहे. तर आपल्या चित्रपटासाठीचे डिस्ट्रिब्यूशन राइट्स, प्रोडक्शन कंपनी सलमान खान आणि टीव्ही शोच्या माध्यमातून ती पैसा कमवत आहे.

मात्र आता सलमानने त्याचा व्यवसाय पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचा निर्णय घेतल्याने लवकरच स्वत:चे चॅनल काढणार असल्याची शक्यता आहे. कॉमिडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) टीव्हीवरील कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) साठी सुद्धा मोठा निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. जर 'कपिल शर्मा शो' कार्यक्रमाचे लायसन सलमान खान ह्याला मिळाल्यास याबद्दल अधिक चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याचसोबत सलमानच्या चॅनलवर द कपिल शर्मा शो शिफ्ट केला जाऊ शकतो.(हेही वाचा-नोटबुक चित्रपटातील 'या' गाण्यावरुन सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल)

सलमान फक्त चित्रपट आणि मनोरंजनावर पैसे खर्च करत नाही तर सामाजिक संस्था बिंग ह्युमनचा विकास करण्याकडे लक्ष देतो. तसेच फाउंडेशन संबंधित त्याने तयारी सुरु केली आहे. सलमान खान हा त्याचा आगामी चित्रपट 'भारत' मध्ये कतरिन कैफ आणि सुनील ग्रोवर ह्याच्यासह दिसून येणार आहे.