नोटबुक चित्रपटातील 'या' गाण्यावरुन सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल
सलमान खान (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याचा आगामी चित्रपट 'नोटबुक' (Notebook) येत्या 29 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटात जहीर इकबाल आणि प्रनूतन मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. सलमान खान या चित्रपटाचा प्रोड्युसर असून तो या चित्रपटातून पुन्हा एकदा गाणे गाताना दिसून येणार आहे. नोटकबुक चित्रपटातील 'मैं तारे' (Main Taare) असे गाण्याचे नाव असून त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या गाण्याचा टीझर व्हिडिओ ट्रेन्ड अॅनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) ह्याने ट्वीटरवरुन पोस्ट केला आहे. परंतु गाण्याचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सलमानच्या आवाजातील गाणे आवडले नसून त्याला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले आहे. काही नेटकऱ्यांनी असे म्हटले आहे की, सलमानचा आवज एडिट केला आहे.तर काहींनी गाण्याची खिल्ली उडवली आहे.(हेही वाचा-काळवीट शिकार प्रकरण: सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांच्यासह अन्य कलाकारांना जोधपुर हायकोर्टाने 'या' कारणामुळे धाडली नोटीस)

सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल ट्वीट:

यापूर्वी सलमानने हीरो आणि रेस-3 चित्रपटातून ही गाणे गायले आहे. मात्र नोटबुक चित्रपटातील मैं तारे हे गाणे यापूर्वी गायक आतिफ असलम याने गायले होते. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली गेली. त्यामुळे सलमानने आतिफच्या आवाजातील गायलेले हे गाणे काढून टाकून पुन्हा स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड केले आहे.