Salman Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड भाईजान सलमान खान (Salman Khan) गेल्या अनेक दिवसांपासून पनवेल (Panvel) मधील आपल्या फार्महाऊसवर आहे. फार्महाऊसवरील गमती जमती सलमान आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. कधी घोडेस्वारी करताना तर कधी शेतात काम करतानाचे फोटोज त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अलिकडेच सलमान खान याने शेतकऱ्यांना सन्मान करणारा फोटो शेअर केला होता. या फोटोत सलमानच्या अंगाला खूप माती लागल्याचे दिसत आहे. त्यावरुन सध्या तो चांगलाच ट्रोल होत आहे.

सलमान खान याने हा फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले, सर्व शेतकऱ्यांचा सम्मान. मात्र सलमानच्या या फोटोवरुन ट्विटरवर वेगळीच चर्चा सुरु झाली. "हा फोटो बनावट आहे, केवळ फोटो काढण्यासाठी सलमानने पोज दिली आहे," अशा कमेंट्सने सलमान खान याला ट्रोल करण्यात येत आहे. सलमान खान याच्या हातावर माती लागलेली नाही यावरुन तो हे सर्व शो-ऑफ साठी करत असल्याचे काही युजर्सचे म्हणणे आहे.

सलमान खान पोस्ट:

पहा ट्रोलिंग कमेंट्स:

तसंच पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणी सलमान खानवर टीका करण्यात येत आहे. यापूर्वी सुशांतच्या आत्महत्येनंतर युजर्सने सलमान खानवर निशाणा साधला होता. त्यावर सलमान खान याने सुशांतच्या 'कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या भावना समजून घ्या' असे आवाहन आपल्या चाहत्यांना केले होते. दरम्यान सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी सलमान खान विरोधात बिहार  येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.