Salman Khan Video at IFFI Goa: घट्ट मिठी, खास चुंबन; अभिनेता सलमान खान याचा इफ्फी सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल
Salman Khan (Photo Credit - Facebook)

Salman Khan News: गोव्यातील 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (54th International Film Festival of India) उपस्थित बॉलिवुडप्रेमींना एक हटके क्षण पाहायला मिळाला. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने 'फॅरे' चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी त्याची भाची अलिझेह अग्निहोत्री सोबत कार्यक्रमाला (IFFI Goa)  उपस्थिती लावली. तसेच, सध्या 'टायगर 3' च्या यशाने उंच भरारी घेत असलेल्या सलमानने मीडियातील जुन्या पत्रकार मित्रासोबत हास्यविनोद करत पापाराझींना चांगली रसद पुरवली. यावेळी सलामाने त्याच्या जुन्या मैत्रिणीला घट्ट मिठी (Salman Khan Tight Hugs) मारली आणि तिच्या प्रमाने तिच्या कपाळावच ओठ टेकवच छान चुंबनही घेतले. ही घट्ट मिठी आणि खास चुंबन सोशल मीडियावर व्हायलल झाले आहे.

फॅरी'च्या कलाकारांसोबतच पोझ:

IFFI गोव्यातील प्रमुख व्यक्ती असलेल्या सलमान खानने केवळ 'फॅरी'च्या कलाकारांसोबतच पोझ दिली नाही तर एका ज्येष्ठ पत्रकारासोबत एक हृदयस्पर्शी क्षणही शेअर केला. मीडियामध्ये त्याच्या मैत्रिणीला पाहून, सलमानने खेळकरपणे तिला मिठी मारली आणि कपाळावर चुंबन घेतले. उपास्थितांमधे वातावरण आणखीच हलकेफुलके झाले. तसेच, हे दृश्य पाहून अनेकांच्या ओठांवर हास्य आले. परस्परांमध्ये असलेला सौहार्दही काही अधिक घट्ट झाला. हे आनंददायक पुनर्मिलन अनेकांनी कॅमेऱ्याने टिपले.

'टायगर 3'चे यश:

मनीष शर्मा दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित सलमान खानचा नुकताच आलेला 'टायगर 3' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. YRF स्पाय युनिव्हर्सचा एक भाग असलेल्या अॅक्शन-थ्रिलरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ अनुक्रमे अविनाश आणि झोयाच्या भूमिकेत आहेत. शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांच्या कॅमिओ भूमिकांसह, 'टायगर 3' मध्ये स्टार-स्टडेड कलाकार आहेत.

'टायगर'चा गल्ला:

'टायगर 3' ने बॉक्स ऑफीसवर चांगलाच गल्ला जमावला आहे. त्याने भारतातील सर्व भाषांमध्ये पहिल्या दिवशी 44.50 कोटी रुपयांची कमाई केली . 21 नोव्हेंबर रोजी 10 व्या दिवसापर्यंत, चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 243.60 कोटी रुपयांवर पोहोचले होते. 300 कोटी रुपयांच्या कथित बजेटसह, 'टायगर 3' हा यशराज फिल्म्सचा सर्वात महागडा प्रकल्प आहे, जो सलमान खानच्या बॉक्स ऑफिसवरील दमदार वाटचालीची पुष्टी करतो.

अभिनेता सलमान खान हा प्रदीर्घ काळाबासून भारती चित्रपटसृष्टींध्ये सुपरस्टार राहिला आहे. अभिनेत्री भाग्यश्री हिच्यासोबत त्याने 'मैने प्यार किया' चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. तेव्हापासून त्याने एकापेक्षा एक असे अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये 'तेरे नाम', 'टायगर', 'बॉडिगार्ड', 'क्यूंकी', 'वॉंटेड', 'दबंग' अशा एकापेक्षा एक चित्रपटांचा समावेश आहे.