Independence Day 2020: स्वातंत्र्य दिनानिमित्त सलमान खान वर चढला देशभक्तीचा रंग; 'सारे जहाँ से अच्छा' गाणे गातानाचा व्हिडिओ भावोजी अतुल अग्निहोत्री ने केला शेअर
Salman Khan (Photo Credits: Twitter)

प्रत्येक भारतीयासाठी अतिशय महत्त्वाचा असा आजचा दिवस. आजच्या या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज स्वातंत्र्याचा 74 वा वाढदिवस (74th Independence Day) आहे. या दिवशी ठिकठिकाणी ध्वजावंदन करून देशभक्तीचे नारे दिले जातात. आज सर्वांनाचा देशभक्तीचा रंग चढला असताना दबंग सलमान खान (Salman Khan) देखील कसा मागे राहिल. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्याने गायलेले 'सारे जहां से अच्छा' हे गाणे सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याचे भावोजी तसेच दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री (Atul Agnihotri) याने शेअर केले आहे.

सलमान खानने हे सुंदर देशभक्तीपर गीत गाऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

हेदेखील वाचा- Bigg Boss 14: सलमान खान बिग बॉसच्या सीझन साठी सज्ज; पहा नव्या प्रोमोची पहिली झलक

सलमान खानला गाण्याची फार आवड आहे. त्याने आपल्या अनेक चित्रपटातही देखील गाणी गायली आहेत. मात्र 15 ऑगस्ट निमित्ताने गायलेले 'सारे जहां से अच्छा' हे गाणे काही विशेष आहे.

लवकरच सलमान खान 'बिग बॉस सीझन 14' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. यंदाच्या बिग बॉस सीझन 14 मध्ये काही खास आणि हटके अंदाज बघायला मिळणार आहे. दरम्यान काही मीडीया रिपोर्ट्सनुसार, यंदाचा सीझन लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंग यांच्या अवतीभवती फिरणार्‍या थीमवर असू शकतो. याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मागील काही दिवसांत बिग बॉसच्या घरात निया शर्मा एंट्री घेणार असल्याच्यादेखील चर्चा रंगल्या होत्या.