Salman Khan | (Photo Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान लग्न (Salman Khan Marriage) कधी करणार? या एकाच प्रश्नाने त्याच्या चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांनाही गेली अनेक वर्षे पछाडले आहे. सध्या वयाच्या पन्नाशी पार असलेल्या सलमानला आजही जाहीर कार्यक्रमात हा प्रश्न हमखास विचारलाच जातो. आजवर या प्रश्नाचे उत्तर सलमान खान (Salman Khan) मोठ्या खुबीने टाळत आला. पण, 'भारत' चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त एका मुलाखतीत सलमानने विवाहसंस्था आणि लग्न या प्रकाराबद्दल थेट मत नोंदवले. जे ऐकूण, वाचून त्याच्या चाहत्यांच्या मनातल्या प्रश्नाला उत्तर मिळेल. पण, सलमानचे उत्तर ऐकूण विवाह संस्था प्रमाण माणाऱ्या मंडळींना मात्र जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. असे काय बलला सलमान? आता पाहा तुम्हीच.

ईदच्या मुहूर्तावर सलमान खान याचा 'भारत' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विवाह/लग्न या प्रकाराबद्दल बोलताना सलमान म्हणाला, लग्न! माझा लग्नावर अजिबात विश्वास नाही. मला वाटते लग्न म्हणजे एक मरणसंस्था आहे. पण, असे असले तरी माझा मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे. मैत्रीच्या नात्याबद्दल आपल्याला आदर असल्याचेही सलमान म्हणाला. दरम्यान, सोरोगसी पिता होण्याबाबत त्याला विचारले असता, 'ते जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल' असे सांगत सलमान भाईने हा विषय पद्धतशीर टाळला. भारत चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, 'टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सलमानने हा विचार बोलून दाखवला. (हेही वाचा, 'भारत' चित्रपटातील सलमान खान ह्याला ओळखू सुद्धा शकणार नाहीत, लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा)

दरम्यान, विवाहसंस्थेबद्दल सलमानने पहिल्यांदाच आपले विचार व्यक्त केले नाहीत, तर या आधीही सलमानने विवाहाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत. या आधीच्या मुलाखतीत बोलताना सलमान म्हणाला होता, आजच्या जगात विवाह ही टिकाऊ गोष्ट राहिली नाही. अलिकडे विवाह टिकताना दिसतच नाही. दरम्यान, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सलमान आणि कैटरिना कौफ एकत्र आले होते. या वेळी सलमानच्या विवाहाबद्दल कैटरिना कैफला विचारण्यात आले होते तेव्हा, ‘तो लग्न कधी करणार याचं उत्तर फक्त देवाकडे आणि सलमानकडे आहे,’ असे तिने मोठ्या मिष्कीलपणे सांगितले होते. सलमान आणि कैटरिना यांच्यातील मधूर संबंधाबाबतची चर्चा प्रसारमाध्यमांतून जोरकसपणे सुरु आहे. कदाचित आपल्यापर्यंतही ती पोहोचली असेलच.