Salman Khan च्या 'Radhe' चित्रपटाने आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर केली इतकी कमाई
Salman Khan's Radhe Movie Poster (Photo Credits: Instagram)

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा बहुप्रतिक्षित चित्रपट राधे:युअर मोस्ट वॉन्टेट भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला IMDB वर सर्वात कमी स्टार्स मिळाले असले तरी आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर (International Box Office) या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 2 मिलियन डॉलर्स इतकी कमाई केली आहे. हा चित्रपट 13 मे रोजी ईदचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आला होता. आता बॉक्स ऑफिस इंडियावर छापलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, या चित्रपटाने जवळपास 1.875 डॉलर्स ( 13 कोटी 72 लाख) इतकी कमाई केली आहे.

राधे चित्रपटाची अधिकतम कमाई ही गल्फ मार्केटमधून आली आहे. यात संयुक्त अरब अमीरातमधून पहिल्या आठवड्यात 1 मिलियन डॉलर इतकी कमाई झाली आहे. तर युएईमध्ये शनिवारी या चित्रपटाच्या कमाईमध्ये थोडीशी घट झालेली पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियामध्ये 350 हजार डॉलर्सची कमाई झाली आहे.हेदेखील वाचा- Radhe: सलमान खानला धक्का; IMDB वर राधेला मिळाले फक्त 1.9 रेटिंग, भाईजानच्या करियरमध्ये दुसऱ्यांदा सर्वात कमी Rating

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अमेरिकेत या चित्रपटाने 200 हजार डॉलर्सची कमाई केली आहे. हा चित्रपट आज युकेमध्ये प्रदर्शित होईल. ज्यामुळे याच्या कमाईत आणखी वाढ झाल्याचे पाहायला मिळू शकते.

दरम्यान राधे चित्रपट प्रदर्शनानंतर काही तासांतच इंटरनेटवर लीक झाला. हा चित्रपट टोरेंट, टेलीग्राम आणि अन्य पायरेसी साइट्सवर अवैधरित्या लीक करण्यात आला आहे. ज्यानंतर सलमानने सर्वांना सोशल मिडियावर एक संदेश पायरेसीला बळी पडू नका असे सांगितले होते. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते असेही तो म्हणाला.