Salman Khan's Radhe Movie (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत आहे. कोविड-19 (Covid-19) अर्थ संकट घेऊनच आले आहे. त्यामुळे उद्योगधंदे, व्यवसाय यासोबतच जीवाला धोका निर्माण झाला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीतील कामकाज बंद आहे. अनेक सिनेमांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत आहेत तर काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जात आहेत. यातच 'तूफान' सिनेमाचे प्रदर्शन स्थगित करत असल्याचे अभिनेता फरहान अख्तर याने सांगितले.. त्यानंतर सलमान खान (Salman Khan) याच्या 'राधे' सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले. 'राधे' (Radhe) सिनेमाचे रिलीज देखील स्थगित करण्यात येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टमधील सर्व अडथळ्यांचे खंडन करत सलमान खान आपल्या कमिटमेंटवर कायम राहणार असून निर्धारित दिवशीच सिनेमा प्रदर्शित होईल, असे सांगण्यात येत आहे. सलमान खान, दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.तसेच गीप्लेक्स आणि झी 5 वर पर वे व्ह्यु नुसार रिलीज करण्यात येईल.

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan Films (@skfilmsofficial)

यावर बोलताना झी स्टुडिओज चे चीफ बिजनेस ऑफिसर शारिक पटेल यांनी सांगितले की, "सलमान खानच्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. 13 मे रोजी राधे सिनेमा रिलीज होत आहे. यावरुन सोशल मीडियावर आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाचे गाणे 'सीटी मार' हिट झाले असून त्याला 100 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर एकत्र रिलीज होणारा हा पहिला सिनेमा आहे." (अभिनेता सलमान खान याचा COVID19 मध्ये पुन्हा एकदा मदतीचा हात, इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मजूरांच्या खात्यात थेट ट्रान्सफर करणार रक्कम)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राधे सिनेमाचे रिलीज टाळण्याचा प्रश्नच येत नाही. कारण युएई मध्ये या सिनेमाचे अॅडवान्स बुकींग सुरु झाले आहे. सध्याच्या कठीण काळात हा सिनेमा हसण्याची संधी देणार आहे. यंदा अनेकजण ईद निमित्त नातेवाईकांना भेटू शकणार नाहीत. अशावेळी आपल्या कुटुंबियांसह राधे सिनेमा पाहून ईद साजरा करतील.