कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षासारखा यंदा सुद्धा परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा शूट आणि अन्य गोष्टी सुद्धा बंद पडल्या आहेत. यामुळे इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मजूरांवर संकट आले आहे. अशातच अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने पुन्हा एकदा कोरोनाच्या काळात मजूरांना मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच सलमान खान याच्याकडून 25 हजार रुपये श्रमिकांना आर्थिक रुपात मदत करण्यासाठी पुढे येणार आहे. अभिनेत्याने कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आल्यामुळे त्याचा फटका बसलेल्या श्रमिकांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्पॉइज (FWICI) चे महासचिव अशोक दुबे यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बातचीत केली. त्यावेळी दुबे यांनी असे म्हटले की, सलमान खान याच्या मॅनेजरने FWICI चे अध्यक्ष बीएन तिवारी यांच्यासोबत बोलणे केले आहे. आम्हाला फेडरेशन मधून 25 हजार श्रमिकांचे अकाउंट डिटेल्स पाठवण्यास सांगितले आहे. अभिनेता प्रत्येक श्रमिकाच्या खात्यात 1500 रुपये जमा करणार आहे. यापूर्वी सुद्धा सलमान खान याने गेल्या वर्षी ही कोविडमुळे फटका बसलेल्या श्रमिकांना मदत केली होती.(COVID-19 ग्रस्तांच्या मदतीसाठी विराट कोहली-अनुष्का शर्माने सुरु केली खास मोहीम, व्हिडिओ शेअर करून केली मदतीची अपील)
अशोक दुबे यांनी पुढे असे म्हटले की, आम्हाला या स्थितीची माहिती सुद्धा नव्हती. कारण डिसेंबर पासून काम सुरु झाले होते. फेब्रुवारी पर्यंत काही श्रमिकांना नोकरी मिळणे सुरु झाले होते. यासाठी आम्ही खुश होतो. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट आली आणि श्रमिकांना काम मिळणे बंद झाले आहे. आता अंदाज लावणे सुद्धा मुश्किल आहे की, पुन्हा एकदा गोष्टी कधी रुळावर येतील.
दरम्यान, गेल्या वर्षात कोरोनाची परिस्थिती पाहता देशात लॉकडाऊन लागू केल्याने सर्व इंडस्ट्रीसह चित्रपट उद्योगाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन जसा उठवण्यात आला तेव्हा काही गोष्टी नीट सुरु झाल्या. डेली वर्कर्सला सुद्धा काम मिळणे सुरु झाले. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर अत्यावश्यक सेवासुविधा सोडून सर्वच गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत.