Salman Khan And DIsha Patani Kissing Scene (Photo Credits: YouTube)

Salman Khan Kissing Scene in Radhe: सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe: Your Most Wanted Bhai) चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. इंटरनेटवर हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एका ट्रेलरमधील एका सीनमुळे चाहत्यांना धक्काच बसला. या सीनमध्ये सलमानने आपली जुनी शपथ मोडली आहे. आजतागायत आपल्या एकाही सिनेमामध्ये किसिंग सीन न देणा-या सलमानने या चित्रपटात दिशा पटानीला (Disha Patani) ऑनस्क्रीन किस केले आहे. हा सीन पाहून अनेक तरुणींचे हृदय तुटले असेल. मात्र या सीनवर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

राधे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खान आपली सहकलाकार दिशा पटानी हिला किस करताना दिसत आहे. सलमान आणि दिशाच्या या सीनला मेकर्सने सिनेमेटोग्राफीच्या मदतीने शॅडो स्टाईलमध्ये सादर केले आहे.हेदेखील वाचा- Radhe: Your Most Wanted Bhai Trailer: बहुप्रतिक्षित 'राधे' सिनेमाचा ट्रेलर आऊट; अॅक्शन थ्रिलर सिनेमात पहा Salman Khan चा दमदार अंदाज (Watch Video)

Salman Khan And DIsha Patani Kissing Scene (Photo Credits: YouTube)

सलमानने अलीकडेच आपल्या मुलाखतीत सांगितले होते, "जेव्हा मी घरी आपल्या कुटूंबासोबत चित्रपट पाहायचो तेव्हा आम्हाला अशा सीनमुळे अवघडल्यासारखे वाटायचे. आमचे कुटूंब इंग्लिश चित्रपट पाहायचे. जेव्हा असा सीन यायचा तेव्हा आम्ही मुले शरमून इकडे तिकडे बघायचो. तेव्हापासून मी ठरवले की, मी असा सीन देणार नाही."

प्रभूदेवा दिग्दर्शित राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट येत्या 13 मे 2021 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तसेच या चित्रपटात मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव आणि प्रवीण तरडे देखील दिसणार आहेत.