सलमान खान माझ्याशी लग्न करत आहे म्हणणाऱ्या अभिनेत्री जरीन खान हिची सोशल मीडियात चर्चा, वाचा सविस्तर
Zareen Khan wants to marry Salman Khan. (Photo Credits: PTI/Instagram)

बॉलिवूड (Bollywood)  मध्ये भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या सिनेमांइतकाच तो लग्न कधी करतोय हा चर्चेचा विषय असतो. सलमानचे असंख्य चाहते त्याला नवरदेवाच्या वेशात बघण्यासाठी अक्षरशः आस लावून बसले आहेत. आजवर अनेक अभिनेत्रींनी देखील त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे पण सलमान आहे की त्याने आपले सिंगल स्टेटस कायम ठेवले आहे. अलीकडेच अभिनेत्री जरीन खान (Zareen Khan) हिने देखील एका मुलाखतीत आपल्याला सलमान सोबत लग्न करायला आवडेल असे अप्रत्यक्षपणे म्हंटले आहे. (BIGG BOSS 13 : बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी Salman Khan किती पैसे घेणार? रक्कम घ्या जाणून)

झालं असं की, जरीनला स्वतःबद्दल एखादी अफवा पसरवायची झाल्यास काय सांगशील असा प्रश्न करण्यात आला, ज्यावर उत्तरं देताना तिने "मी स्वतःबद्दल एखादी मजेशीर अफवा पसरवायची असेल तर, सलमान माझ्याशी लग्न करत आहे असे सर्वाना सांगेन असे म्हंटले. यानंतर जरीनला मुलाखतीत सलमान, गौतम रोडे आणि कारण सिंग ग्रोव्हर यांचे पर्याय देऊन कोणाशी लग्न करशील, कोणाला मारशील व हुक अप साठी कोणाला निवडशील असा प्रश्न करण्यात आला होता. यावर देखील तिने हुशारीने सलमानलाच निवडले. खरंतर जरीनने ही उत्तरे मस्करीत दिले असले तरी यानंतर सलमान आणि जरीच्या फॅन्समध्ये बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.

जरीन खान आणि सलामन खान यांनी 'वीर' या सिनेमात एकत्र काम केले होते. हा जरीन चा बॉलीवुड मधील पहिला सिनेमा होता, मात्र या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमल केली नव्हती. यापाठोपाठ जरीनला 'हेट स्टोरी 3', 'अक्सर 2' और '1921' यांसारख्या अनेक चित्रपटात काम करण्याचे संधी मिळाली होती, मात्र मागील काही काळापासून ती बॉलिवूडपासून लांब आहे. तर दुसरीकडे सलमान खान लवकरच 'दबंग-3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.