सलमान खानला जीवे मारण्याची धमकी; २ जण अटकेत
Salman Khan (Photo Credits: Yogen Shah)

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याला 16 सप्टेंबर रोजी सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याच्या धमकी आली होती. गॅरी शूटर या फेसबुक अकाउंटवरून ही धमकी आली असून आज अखेर राजस्थान येथील चोपासणी पोलीस स्थानकाने 2 जणांना या प्रकरणात अटक केले आहे.

पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिष्णोई व जगदीश ही या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेंस आणि जगदीश हे गाडी चोरी व ड्रॅग डीलिंग करत असत आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी सलमानला धमकी दिली होती. दोघांनी मिळून 2 गाड्या चोरल्या असून ते त्या ड्रॅग स्मगलिंग वापरणार होते. परंतु पोलिसांना त्यांच्याकडे असलेल्या महागड्या गाड्या बघून संशय आला आणि म्हणूनच त्या दोघांची चौकशी करण्यात आली.