'सलमान खान'चा भाची आयत सोबतचा पहिला फोटो शेअर करताना बहीण अर्पिता शर्मा हिने लिहिली 'ही' भावुक पोस्ट
Salman Khan With Ayat Sharma (Photo Credits: Instagram)

सलमान खान (Salman Khan) याला आपल्या 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने यंदा मिळालेले अनमोल गिफ्ट म्हणजे भाची आयत शर्मा हिचा जन्म. सलमानची बहिण अर्पिता खान शर्माने (Arpita Khan Sharma) सी- सेक्शन पद्धतीने आपली डिलिव्हरी करून भावाच्या बर्थ डे लाच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आज अर्पिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन आपल्या लेकीचा आणि भावाचा पहिला फोटो शेअर केला आहे. सलमानने या फोटो मध्ये आपल्या भाचीला हातात उचलून घेतले आहे तर सोबतच त्याची सलमा खान (Salma Khan) ही फोटो मध्ये पाहायला मिळते आहे, या फोटोला अर्पिताने अत्यंत भावुक कॅप्शन दिले आहे.

फोटो शेअर करताना अर्पिताने, 'या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही ज्याने मला भीती वाटते. कारण मला माहीत आहे की काही झालं तरी तुम्ही माझ्या पाठिशी ठाम उभे असाल आणि मला काहीही होऊ देणार नाही. आता आयतलाही हीच सुरक्षा मिळेल. हे हात देवाने पाठवले आहेत.असे म्हणत सलमानचे आभार मानले आहेत.

अर्पिता शर्मा पोस्ट

अर्पिता आणि आयुषचा 2014 मध्ये विवाह झाला होता. अर्पिता आणि आयुषला 3 वर्षांचा मुलगादेखील आहे. 2016 मध्ये आहिलचा जन्म झाला. सलमानने आपल्या सोशल मीडियावरून अनेकदा आहिलसोबत खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.  दरम्यान, सलमानने नेहमीच आपल्या बहिणीची खूप प्रेमाने देखभाल केली आहे, भाचा आहिलचे देखील सलमानने सर्व लाड पुरवले आहेत, आता या नव्या पाहुणीचं अगदी सलमानच्या वाढदिवसालाच आगमन झाल्याने खान आणि शर्मा कुटुंबाचा आनंद स्पष्ट दिसून येत आहे.