'माझी जमीन स्वस्तात बळकावण्यासाठी 'Salman Khan' ने दाखल केला बदनामीचा खटला'- शेजारी Ketan Kakkad ची कोर्टात माहिती
Salman Khan (Photo Credits: WIki Commons)

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या पनवेल फार्महाऊसचा शेजारी केतन कक्कड (Ketan Kakkad) यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. केतनवर सलमान खानने मानहानीचा दावा दाखल केला आहे. आता केतनने बुधवारी शहर दिवाणी न्यायालयात आभासी सुनावणीदरम्यान सांगितले की, सलमानला त्याची जमीन स्वस्तात हवी होती आणि हा मानहानीचा खटला त्यासाठीच दाखल केला आहे. जेणेकरून आपण ही जमीन सलमानला देऊ करू.

एनआरआय केतन कक्कडच्या वकिल आभा सिंह यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, ‘हा जमिनीचा मुद्दा आहे, बदनामीच्या खटल्यामुळे जमिनीसाठी लढावे अशी त्यांची इच्छा नाही.’ त्या पुढे म्हणल्या, सहसा दोन शेजार्‍यांमध्ये जमिनीशी संबंधित वाद होत असतात. हा खटला फेटाळला पाहिजे. वकिलांनी पुढे सांगितले की, कक्कड यांनी आपल्या समस्यांबद्दल एका मंत्र्याशी संपर्क साधला होता. परंतु काही काळानंतर या मंत्र्यांच्यासोबतचा सलमान खानचा एक फोटो समोर आला, जो पाहून कक्कड फार निराश झाले.

वकिलांनी असेही सांगितले की, सलमानने यांची इतकी बदनामी केली की या जोडप्याला भारत सोडायचा आहे. कक्कडच्या एका मुलाखतीच्या एका भागावर सलमान खानच्या दाव्यामध्ये आक्षेप घेतला आहे. यामध्ये म्हटले आहे की, कक्कडने एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने निसर्गावर बलात्कार केला आहे, असे विधान केले. आता याबाबत अॅडव्होकेट सिंग यांनी स्पष्टीकरण दिले की, अभिनेत्याने पर्यावरण-संवेदनशील भागात 20 पेक्षा जास्त संरचना बांधल्याच्या संदर्भात ते विधान होते. या प्रकरणी उद्याही सुनावणी सुरु राहणार आहे. (हेही वाचा: Haryana: हरियाणवी गायिका सरिता चौधरी यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, घरात सापडला मृतदेह)

दरम्यान याआधी, सलमानच्या वकिलाने सांगितले होते की, कक्करने केलेल्या आरोपांबाबत कोणतेही पुरावे नाहीत आणि अतिक्रमण प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. सलमान खान एक सेलिब्रिटी आहे आणि त्याची बदनामी करण्यासाठी त्याने आरोप केले आहेत, ज्यामुळे त्याच्या फॅन फॉलोइंगवर परिणाम होऊ शकतो.