हिंदू संघटनांना घाबरून सलमानने बदलले ‘लव्हरात्रि’ चित्रपटाचे शीर्षक, पहा काय आहे चित्रपटाचे नवीन नाव
सलमान खान आणि लोकेंद्र सिंह कालवी (Photo Credits: IANS/ Movie Still)

सलमान खान आपल्या होम प्रॉडक्शनमार्फत नव्या ‘लव्हरात्रि’ चित्रपटाद्वारे मेहुणा आयुष शर्माला लॉंच करत आहे. आयुष सोबत या चित्रपटात वरिना हुसैन ही अभिनेत्रीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे . मात्र प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सांगितले जात आहे की, लव्हरात्रि हे नाव पवित्र सण नवरात्रीशी मिळतेजुळते आहे, त्यामुळे चित्रपटाच्या नावावर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. उत्तर प्रदेशातील ‘हिंदू ही आगे’ या हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख गोविंद पराशर यांनी सलमानला भर रस्त्यात मारणा-यास ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. ठीकठिकाणी चित्रपटाच्या पोस्टर्सची होळी करण्यात आलेली होती, बिहारमध्ये एका वकिलाने हे शीर्षक हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याने शीर्षकाविरोधात तक्रार देखील केली होती. हे सगळे वाद पाहता सलमान यावर काही पावले उचलणार नाही, हे नवलच.

‘पद्मावत’च्या वेळी झालेला वाद आजही कित्येकांना आठवत असेल. वादाची ठिणगी इतकी मोठी होती की शेवटी भन्साळींना चित्रपटाचे शीर्षक बदलावेच लागले. यातूनच धडा घेऊन सलमानने चित्रपटाचे नाव बदलणेच योग्य समजले, आणि मंगळवारी रात्री सलमानने नव्या नावासह चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले. ‘ही स्पेलिंग मिस्टेक नाही’ असे सलमान ने पोस्टर प्रदर्शित करताना लिहिले आहे. तर आता चित्रपटाचे नवीन नाव आहे 'लव्हयात्री'

 

 

View this post on Instagram

 

This is not a spelling mistake... #loveyatri #lovetakesover... @skfilmsofficial @aaysharma @warinahussain @tseries.official @abhiraj88

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

एका मुलाखतीत सलमानने ‘लव्हरात्रि’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून निर्माण झालेल्या वादावर खुलासा केला होता. “कुठल्याही चित्रपटाने अथवा त्याच्या शीर्षकामुळे कुठल्याही संस्कृतीच्या लोकांच्या भावना दुखावत नाहीत. पण काहींनी त्यावर आक्षेप घेतला आहे आहे” असे सलमान म्हणाला होता. आता सलमानने चित्रपटाचे नावच बदल्याने या वादावर पडदा पडल्याचे आपण समजूया. सलमान आणि त्याच्या टीमला चित्रपट प्रदर्शित होताना कोणतेही वाद नको आहेत, म्हणूनच वेळीच सलमान हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला याने केले असून हा चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.