बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) मंगळवारी म्हणजेच 27 डिसेंबर 2022 रोजी आपला 57 वा वाढदिवस (Salman Khan Birthday) साजरा करत आहे. बॉलिवूडच्या या प्रसिद्ध सुपरस्टारची इंडस्ट्रीत एक खास ओळख आहे. आज देशातच नव्हे तर परदेशातही भाईजानच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे, यावरूनच लोक सलमानवर किती प्रेम करतात हे दिसून येते. सलमान त्याच्या अनोख्या डान्स मूव्ह, अॅक्शन आणि चित्रपटांमधील ऑफबीट अभिनयासाठी ओळखला जातो. आजही त्याचा फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
सलमानने 1988 मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामुळे सलमान रातोरात स्टार झाला. या एका चित्रपटामुळे सलमानचा मोठी प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
सलमान खानच्या प्रमुख चित्रपटांमध्ये मैने प्यार किया, साजन, सनम बेवफा, हम आपके है कौन, करण अर्जुन, जुडवा, प्यार किया तो डरना क्या, बीवी नंबर वन, जब प्यार किसीसे होता है, बंधन, दुल्हन हम ले जायेंगे, चल मेरे भाई, हर दिल जो प्यार करेगा, ढाई अक्षर प्रेम के, कहीं प्यार ना हो जाए, चोरी चोरी चुपके चुपके, हम दिल दे चुके सनम, नो एंट्री, पार्टनर, वाँटेड, तेरे नाम, दबंग, रेडी, बॉडीगार्ड, एक था टायगर, टायगर जिंदा है, दबंग-2, किक, बजरंगी भाईजान, राधे आदींचा समावेश आहे.
आपल्या 34 वर्षांच्या करियरमध्ये सलमानला देश विदेशात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण सलमान खानला मिळालेले असेच काही महत्वाचे पुरस्कार पाहणार आहोत. (हेही वाचा: Pathaan: किंग खानच्या ‘पठाण’ची रिलिजपूर्वीच कोटींची कमाई, ‘त्या’ गाण्याच्या माध्यमातून शाहरुख-दिपीकाने रचला नवा इतिहास)
चित्रपट पुरस्कार-
सलमानला आतापर्यंत 2 राष्ट्रीय पुरस्कार, 2 फिल्मफेअर पुरस्कार, 3 स्क्रीन पुरस्कार, 2 आयफा पुरस्कार, 3 झी सिने पुरस्कार, 3 स्टारडस्ट पुरस्कारसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
इतर पुरस्कार-
2004- जगातील 7वा बेस्ट लुकिंग मॅन - पीपल मॅगझिन, यूएसए
2008- लंडनच्या मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा बसवला
2010- सेक्सीएस्ट मॅन अलाईव्ह - पीपल मॅगझिन, भारत
2012- न्यूयॉर्कच्या मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा
2012- एनडीटीव्ही पोलमध्ये तिसऱ्या नंबरचा ‘इंडियाज ग्रेटेस्ट अॅक्टर’ म्हणून निवड
2013- भारतातील सर्वाधिक ऑनलाईन सर्च केला गेलेला सेलिब्रिटी
2014- प्रसिद्धी आणि कमाई या दोन्ही बाबतीत फोर्ब्स इंडिया चार्टमध्ये अव्वल
फोर्ब्स मॅगझिन, यूएसए द्वारे 'सेलिब्रिटी 100: द वर्ल्ड्स टॉप पेड एंटरटेनर्स' मध्ये 71 वा क्रमांक
2015- फोर्ब्सद्वारे जगातील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांच्या जागतिक यादीत 7 वा क्रमांक
2016- worldstopmost.com वरील जगातील सर्वात सुंदर चेहऱ्यांच्या यादीत 7 वा क्रमांक
2018- तेहरान इंटरनॅशनल स्पोर्ट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुलतानमधील त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार.
2019- भारतातील सर्वात विश्वासार्ह व्यक्तिमत्वाच्या चार्टमध्ये तिसरा क्रमांक
2020- TRA मोस्ट डिझायर्ड पर्सनॅलिटीजच्या यादीत दुसरा क्रमांक.
यासोबतच ओरमॅक्स मीडियाने केलेल्या सर्वेक्षणात, सलमान खानला 'सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड स्टार' म्हणून ओळखण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे हे वेगळेपण त्याने 2010 ते 2015 पर्यंत सलग 5 वर्षे मिळवले आहे.