Bajrangi Bhaijaan 2: सलमान खानने केली 'बजरंगी भाईजान 2'ची घोषणा
bajrangi bhaijaan ( Photo Credit - FB)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सलमानचा ब्लॉकब्लास्टर चित्रपट 'बजरंगी भाईजान'चा सीक्वल (Bajrangi Bhaijaan 2) लवकरच येणार आहे. या चित्रपटाबाबत स्वत: सलमान खाननं सांगितले आहे. एसएस राजामौली (S.S Rajamouli) दिग्दर्शित आरआरआर (RRR) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, (Aliya Bhatt) राम चरण, (Ram Charan) ज्युनियर एनटीआर (JN NTR) आणि अजय देवगण (Ajay Devgan) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. RRR चित्रपटाचा कार्यक्रम रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान उपस्थित होता. या कार्यक्रमात सलमानने बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली असुन ज्यानंतर त्याचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.

बजरंगी भाईजान हा सलमान खानच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. आता तो या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट एसएस राजामौली यांचे वडील विजेंद्र प्रसाद लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पटकथाही लिहिली आहे.  बजरंगी भाईजानने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली होती आणि आतापर्यंत बॉलीवूडमधील टॉप 5 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश आहे. (हे ही वाचा Gehraiyaan Tesear Release: दीपिका पदुकोण-सिद्धांत चतुर्वेदी यांचा 'Gehraiyaan' चित्रपट OTTवर होणार प्रर्दर्शित, अनन्या पांडे-नसीरुद्दीन शाह खास भूमिकेत.)

यापूर्वी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत विजेंद्र प्रसाद यांनी सांगितले होते की बजरंगी भाईजानच्या सिक्वेलसाठी ते एक कथा लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले होते की मी बजरंगी भाईजान 2 स्क्रिप्ट लिहण्याचा प्रयत्न करत आहे. मी सलमानला याची कल्पना दिली आणि तो खूप उत्साहित आहे.

बजरंगी भाईजान हा चित्रपट 17 जुलै 2015 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. कबीर खान दिग्दर्शित बजरंगी भाईजानमध्ये सलमान खान आणि करीना कपूरसरह नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते. याशिवाय ,बालकलाकार हर्षालीचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटानं भारतात 300 कोटींची कमाई केली होती.