प्रसिद्ध चित्रपट संवाद लेखक आणि बॉलीवुड अभिनता सलमान खान (Salman Khan) याचे वडील सलीम खान (Salman Khan) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. सलीम हे मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात महिलेने त्यांना 'लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याला पाटवू का' अशी कथीत विचारणा करत जीवे मारण्याची धमकी दिली. सलीम खान यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरवरुन आलेल्या एका परुषासोबत पाठीमागे भसलेल्या बुरकाधारी व्यक्तीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तिने त्यांना आव्हान देत 'लॉरेन्स बिश्नोई याला पाठवू काय' असे म्हटले. या प्रकारानंतर खान यांनी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, खान यांनी दिलेल्या माहितीनंतर गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई याचा उल्लेख करुन दिलेल्या धमकीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सदर घटनेप्रकरणी मुंबईतील बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 352 (2), 292 आणि 3 (5) यांसह इतरही अनेक कलमांसह गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.
कोण आहेत सलीम खान?
सलीम खान हे केवळ अभिनेता सलमान खान याचे वडील आहेत असा अनेक लोकांचा समज आहे. पण, ती त्यांची ओळख नाही. त्यांचे चित्रपट क्षेत्रात खास करुन बॉलिवुडमध्ये विशेष योगदान आहे. ते प्रसिद्ध भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि पटकथालेखक आहेत. त्याचा जन्म 24 नोव्हेंबर 1935 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. जावेद अख्तर यांच्यासह सलीम-जावेद या पटकथालेखक जोडीचा तो एक भाग म्हणूनही त्यांना ओळखले जाते. सलीम-जावेत या जोडीने एकत्रितपणे शोले, दीवार आणि झंजीर या यशस्वी चित्रपटांसह अनेक प्रतिष्ठित बॉलिवूड चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. (हेही वाचा, Salman Khan चे वडील Salim Khan यांना मॉर्निंग वॉकच्या दरम्यान वांद्रे परिसरात Lawrence Bishnoi च्या नावे धमकी; आरोपींनी 'खोडसाळपणा' केल्याची पोलिसांची पुष्टी)
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
लॉरेन्स बिश्नोई हा एक कुख्यात भारतीय गुंड आहे. पंजाबच्या फिरोजपूर येथे 12 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मलेला हा तरुण कुख्यात कारवायांसाठी ओळखला जातो. तो पोलीस रेकॉर्डवरचा क्रूर गुन्हेगार आहे. तो अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील आहे, ज्यात खून आणि जबरदस्तीचा समावेश आहे. त्याच्यावर दोन डझनहून अधिक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. कथितरित्या सांगितले जाते की, बिश्नोईच्या टोळीत 700 हून अधिक शूटर1 चे सदस्य आहेत.
पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला यांची हत्या आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान 12 च्या धमक्यांसारख्या उच्च प्रोफाइल गुन्ह्यांमध्ये त्याच्या कथित सहभागामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. तो सध्यातिहार तुरुंगात आहे. मात्र, तरीही गुन्हेगारी वर्तुळात त्याचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते.