मागील काही दिवसांपासून दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या पत्नी सायरा बानो (Saira Banu) प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात आयसीयू मध्ये उपचार घेत असल्याचं समोर आले आहे. यानंतर त्या नंतर नैराश्याचा (Depression) सामना करत आहेत. त्यांनी अॅन्जिओग्राफी (Angiography) करायला नकार दिल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या पण ई टाईम्सच्या वृत्तानुसार, या सार्या खोट्या बातम्या आहेत. सायरा बानोवर हिंदुजा रूग्णालयात उपचार करणार्या डॉक्टर नितीन गोखले यांनी पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, सायरा बानो नैराश्याचा सामना करत नाहीत. त्यांनी अॅन्जिओग्राफीला देखिल नकार दिल्याचं वृत्त खोटं आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर येत्या काही दिवसांमध्ये अॅन्जिओग्राफी केली जाऊ शकते. ती करण्यासाठी त्याचा मधुमेह नियंत्रित ठेवणं गरजेचे आहे. आता त्या आयसीयू मधून बाहेर आल्या आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधार असल्याने लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी दिली जाईल. पण अॅन्जिओग्राफीसाठी त्यांना लवकरच पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाईल. (नक्की वाचा: मालमत्तेसाठी दिलीप कुमार यांना धमक्या; सायरा बानो यांनी मागितली नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत).
दरम्यान 7 जुलै 2021 ला दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बॉलिवूड मध्ये ट्रॅजिडी किंग म्हणून ओळख असलेल्या या महान कलाकाराने जगाचा निरोप घेतल्यानंतर त्याच्या निधनावर सार्यांनीच शोक व्यक्त केला होता. यावेळी सायरा बानो देखील भावनाविवश झालेल्या पहायला मिळाल्या.