Saif Ali Khan Takes COVID-19 Vaccine: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने आज मुंबईत (Mumbai) कोविड-19 ची लस घेतली. मुंबईतील ब्रांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra-Kurla Complex) येथील कोविड-19 लसीकरण केंद्रात सैफने लस टोचून घेतली. दरम्यान, देशभरात 1 मार्चपासून कोविड-19 लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या टप्प्यात अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींनी लस घेतली असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.
सैफने लस घेतल्यानंतरचे काही फोटोज समोर आले आहेत. यावेळी सैफने निळ्या रंगाचा कुर्ता आणि क्रिम रंगाची पॅंट परिधान केली आहे. लाल रंगाच्या रुमालाने सैफने आपला चेहरा झाकून घेतला आहे. कोविड-19 लसीचा पहिला डोस घेऊन बाहेर पडत असलेल्या सैफ मीडियाच्या कॅमेऱ्यातून सुटला नाही. त्याचे हे लेटेस्ट फोटोज व्हायरल (Viral) होत आहेत.
पहा फोटोज:
View this post on Instagram
अलिकडेच सैफ अली खान पुन्हा एकदा बाबा झाला आहे. करीनाने 21 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. तैमूर अली खान नंतर करीनाला परत पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. (It’s a Boy for Kareena Kapoor and Saif Ali Khan: करीना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचे आगमन; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव)
दरम्यान, कोविड-19 संकटाच्या काळात बाळ आणि करीनाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात तैमूरही लहान आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सैफने लस घेण्यास प्राधान्य दिले असावे, असे म्हटले जात आहे.