Sai Tamhankar: नागराज मंजुळे यांची नवी वेब सीरिज, सई ताम्हनकर साकारणार महत्त्वाची भमिका

अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आता पुन्हा एकदा हिंदीतील मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. सई ताम्हणकर आता नागराज मंजुळेच्या (Nagraj Manjule) 'मटका किंग' (Matka King) या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.  'मटका किंग' असलेल्या रतन खत्री याच्या आयुष्यावर ही वेब सीरिज बेतली आहे.  अॅमेझॉन प्राईमने "मटका किंग' "ची अधिकृत घोषणा करून सईने देखील या खास प्रोजेक्टचा भाग असल्याचं सांगितले आहे.   ''मटका किंग''चे शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. विजय वर्मासह इतर बॉलिवूड कलाकार या वेब सिरीजमध्ये असणार आहे.  (हेही वाचा -  Sarfira: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपटाचा पोस्टर लॉंच, 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivaji Storm Sen (@stormshivajisen)

नागराज मंजुळे मंजुळेसोबत काम करण्याबद्दल सईने म्हटले की "नागराज मंजुळे सोबत काम करण्याची इच्छा माझी होती आणि ही गोष्ट माझ्या विशलिस्ट मध्ये देखील होती. आता आम्ही 'मटका किंग' सारख्या प्रोजेक्टसाठी सोबत काम करतोय आणि या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होते याचा आनंद आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून पहिल्यांदाच विजय वर्मासोबतही काम करण्याचा अनुभव यामुळे मिळणार असल्याचे सईने सांगितले.  तो एक उत्तम कलाकार आणि त्यांचा सोबत हा प्रोजेक्ट करतेय म्हणून मी खूप उत्सुक असल्याचेही सई ताम्हणकरने सांगितले.

" ग्राउंड झिरो " " अग्नी " सारखे दोन उत्तम चित्रपट आणि आता " 'मटका किंग' " वेब सीरिज या व्यतिरिक्त सई " डब्बा कार्टेल " वेब सीरिज मध्ये सुद्धा दिसणार आहे. या  वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर " डब्बा कार्टेल " रिलीज होणार  आहे.