Saaho New Poster: प्रभास याच्या दमदार अंदाजात 'साहो' सिनेमाचे नवे पोस्टर आऊट
Sahoo New Poster (Photo Credits: Instagram)

साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) याच्या 'साहो' (Saaho) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. आतापर्यंत सिनेमाचे पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून आता सिनेमाचे नवे पोस्टर आऊट झाले आहे. टीझरनंतर प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्यानंतर आता नव्या पोस्टरवरील प्रभास याचा दमदार लूक पाहण्यासारखा आहे.

प्रभासने साहो चे नवे पोस्टर इंस्टाग्रामवर शे्अर केले आहे. यात प्रभास बाईकवर बसलेला दिसत आहे. पोस्टरमध्ये प्रभासने लेदर बाईक जॅकेट परिधान केले असून ब्लूटुथ हँडसेट आणि सनग्लासेस सह बाईकवरील त्याचा लूक अतिशय जबरदस्त दिसत आहे. पहा सिनेमाचा टीझर

प्रभासने हे पोस्टर शेअर करत लिहिले की, "हाय डार्लिंग्स, माझा सिनेमा साहो चे दुसरे पोस्टर समोर आले आहे." प्रभास याचे पोस्टर चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून युजर्स पोस्टरवर खास कमेंट्स करत आहेत.

साहो सिनेमा नवे पोस्टर:

साहो सिनेमा तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुजीत करत असून हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साहो सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या शिवाय नील नितीन मुकेश, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ आणि मंदिरा बेदी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.