Saaho Teaser: धमाकेदार अॅक्शन असलेला 'साहो' चित्रपटाचा टीजर आऊट, पाहा Video
Saaho Teaser (Photo Credits: YouTube)

बाहुबली (Bahubali) फेम अभिनेता प्रभास (Prabhas) 'साहो' (Saaho) चित्रपटात पुन्हा एकदा दमदार अॅक्शन सीन्ससह आपल्यासमोर येणार आहे अशी बातमी आपल्याला याआधीच मिळाली होती. या चित्रपटाविषयी अनेक चर्चा रंगत असताना आता या चित्रपटाचा टीजर (Teaser) प्रदर्शित झाला आहे. श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)  या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. साहो च्या मेकर्स ने इंटरनेटवर हा टीजर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचा टीजर हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये शेअर करण्यात आला आहे.

श्रद्धा कपूर ने सुद्धा हा टीजर आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. टीजरची सुरुवात श्रद्धा कपूरच्या रोमँटिक अंदाजा सुरु होते. मात्र याच्या प्रत्येक फ्रेम तुम्हाला अॅक्शन सीन पाहायला मिळेल. एकूणच हा टीजर पाहून प्रेक्षकांना हाय टेक अॅक्शन सीन्स पाहायला मिळेल हे वेगळं सांगायची गरज नाही.

सुजीत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त जैकी श्रॉफ (Jacky Shroff), नील नितिन मुकेश, मुरली शर्मा आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सुद्धा पाहायला मिळतील. त्याचबरोबर अभिनेता चंकी पांडे सुद्धा प्रथमच एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळेल. साउथ सोबतच बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीस आलेला प्रभास या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे.

Saaho Movie Poster: अभिनेता प्रभास चित्रपटाचे 'साहो' चित्रपटाचे नवीन पोस्टर आले समोर, प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला फोटो

तसेच या चित्रपटात श्रद्धा कपूर सुद्धा अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. याआधी तिने 'बागी' चित्रपटात असेच एकाहून एक सरस असे अॅक्शन सीन्स दिले होते. साहो हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.