दक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) याचा बहुप्रतीक्षित आणि महत्त्वाकांक्षी अॅक्शन एंटरटेनर चित्रपट 'साहो' (Saaho) 30 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र पहिल्याच दिवशी साहो बाबत नकारात्मक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. आता चित्रपटाबाबत समीक्षकांकडून आलेल्या नकारात्मक अभिप्रायांनंतरही साहो सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) तुफान चालत आहेत. अनेक माध्यमांनी या चित्रपटाला अडीच पेक्षा कमी रेटिंग दिले आहे. असे असूनही या चित्रपटाची तिकिटे (Sahoo Film Ticket) हजारो रुपयांना विकली जात आहेत. अशारीतीने साहो हिंदी चित्रपटाने आतापर्यंत जवळजवळ 124 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
#Saaho has an excellent Week 1... Is the fourth highest *Week 1* grosser of 2019... Fri 24.40 cr, Sat 25.20 cr, Sun 29.48 cr, Mon 14.20 cr, Tue 9.10 cr, Wed 6.90 cr, Thu 6.75 cr. Total: ₹ 116.03 cr Nett BOC. #India biz. #Hindi version.
— taran adarsh (@taran_adarsh) September 6, 2019
तरण आदर्श यांनी शुक्रवारी याबाबत एक ट्विट करत माहिती दिली होती. साहो प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण 116.03 कोटी कमावले होते. त्यानंतर दोनच दिवसात या चित्रपटाच्या कमाईने उसळी मारत 124 कोटीचा पल्ला गाठला आहे. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजे 9 व्या दिवसाच्या अखेरपर्यंत साहो चित्रपटाची कमाई साधारण 125 कोटी होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: नकारात्मक प्रतिक्रिया मिळूनही, हजारो रुपयांना विकले जात आहे 'प्रभास'च्या साहोचे एक तिकीट; विकत घेण्यासाठी अनेक किलोमीटरच्या रांगा (Video)
#Saaho (Hindi) beat #bahubali 121crore
First weak. ₹116.03cr
Second weak . Fri ₹3.50cr, Sat ₹4.50c
Total = ₹124.03cr Net
Movie is struggling in others language
— Bollywood Spy (@BollywoodSpy2) September 8, 2019
दरम्यान, दिल्लीतील अनेक थिएटरमध्ये हा चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे. हैदराबादमध्येतर तिकिटांसाठी अनेक किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या आहेत. या चित्रपटाचे बजेट तब्बल 350 कोटी इतके होते. इतका महागडा चित्रपट असूनही याच्या कथेवर लक्ष केंद्रित केले गेले नाही असा लोकांचा अभिप्राय होता. परदेशात अनेक लोकांनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही समीक्षकांनी या चित्रपटाचा ‘बोअरिंग’ असा उल्लेख केला आहे. मात्र कोणी काही म्हणो, बाहुबली फेल प्रभासची हवा वेगळीच आहेत. त्यात साउथमध्ये तर प्रभासचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे रिव्ह्यू काहीही असो, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवनार हे निश्चित.