Fan Movie: चित्रपटगृहात 'फॅन'चे गाणं समाविष्ट न केल्याबद्दल न्यायालयाकडे धाव; YRF जबाबदार नसल्याचा निकाल
Fan Movie Controvery PC TWITTER

Fan Movie: बॉलिवडूचा बादशाह शाहरूक खान स्टारर 'फॅन' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. फॅन चित्रपटाचा 2016च्या ट्रेलरमधील 'जबरा फॅन' हे गाणं चित्रपटगृहात समाविष्ट न केल्याबद्दल यशराज फिल्मला (YRF) दंड लावण्यात आला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचा निकाल लावत, आकरण्यात आलेला दंड रद्द केला आहे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगानुसार (NCDRC) सोमवारी दंड रद्द केला. चित्रपटगृहात 'जब्बरा फॅन' हे गाणं न दाखवल्या बद्दल नाराज झालेल्या एका प्रेक्षकाने तक्रार दाखल केली आणि प्रोडक्शन हाऊलला 10,000 दंड नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. परंतु हा दंड कोर्टाकडून रद्द करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आफरिन फातिमा झैदी नावाच्या प्रेक्षकाने या विरोधात तक्रार दाखल केली. त्याने सांगितले की, चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळीस जब्बरा फॅन हे गाणं दाखवलं होतं परंतु चित्रपटगृहात हे गाणं प्रेक्षकांना दाखवला नाही. त्यामुळे नाराज चाहत्याने YRF विरोधात गुन्हा दाखल केला. अश्यामुळे प्रेक्षकांची फसवणूक होत आहे. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल दाखवला आणि सांगितले की, YRF याला जबाबदार नाही.

मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसला होता. एकीकडे त्याने एका वेड्या चाहत्याचे पात्र साकारले तर दुसरीकडे स्वत:चे पात्रही साकारले.चित्रपटाची प्रेक्षकांना भूरळ पडली होती. यातील जब्बरा फॅन या गाण्याचा चाहता वर्ग वेगळा आहे. चित्रपटाने बॉक्सऑफिसवर भरपूर कमाई केली होती.