RRR Celebration Anthem Teaser: ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट देशभक्तीच्या जल्लोषात, पाहा टीझर
RRR Celebration Anthem Teaser (Photo Credit - Insta)

एसएस राजामौली (S.S Rajamouli) दिग्दर्शित आरआरआर (RRR) चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. आता त्यांच्या उत्साहात भर घालत चित्रपटाच्या निर्मात्यांनी आगामी गाण्याचा टीझर (RRR Celebration Anthem Teaser) शेअर केला आहे. हे गाणे आरआरआर सेलिब्रेशन अँथम आहे ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर (JN NTR), राम चरण (Ram Charan) आणि आलिया भट्ट (Aliya Bhatt) दिसत आहेत. गाण्यात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण जबरदस्त डान्स करताना दिसणार आहेत. दुसरीकडे, आलिया भट्ट दक्षिण भारतीय शैलीत खूप सुंदर  दिसत आहे. टीझर खूपच चांगला आहे आणि आता गाण्यातूनही तेच अपेक्षित आहे.

Tweet

गाण्याचा टीझर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, ये है आरआरआर सेलिब्रेशन अँथम प्रोमो. संपूर्ण गाणे 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजता येईल. प्रोमोमध्ये दोघेही वंदे मातरम लिहिलेला झेंडा फडकावतील. आलियाने गुलाबी आणि लाल रंगाचा पोशाख घातला आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण आणि आलिया हे तिघेही देशभक्तीमध्ये डुंबलेले दिसत आहेत. (हे ही वाचा Fighter Released Date: हृतिक-दीपिकाच्या 'फायटर' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 2023 मध्ये 'या' दिवशी होणार प्रदर्शित)

चित्रपटाबद्दल बोलायचे तर एसएस राजामौली दिग्दर्शित हा चित्रपट 25 मार्चला प्रदर्शित होणार आहे. हे स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लू सीताराम राजू यांच्या तरुण दिवसांची काल्पनिक कथा सांगते. या चित्रपटात अजय देवगणही एका खास भूमिकेत आहे. या चित्रपटाद्वारे आलियाने तेलुगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. या चित्रपटात आलिया आणि अजयच्या उपस्थितीमुळे हिंदी भाषेतील चाहत्यांमध्येही या चित्रपटाची उत्सुकता आहे.