बॉलिवूड अभिनेत्री आणि सर्वांची आवडती जेनेलिया डिसुजा (Genelia D'Souza)आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिचा प्रेमळ पती आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने त्याच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे . ज्यात तो आणि जेनेलिया एकमेकांसोबत मजामस्ती करताना दिसत आहेत. जेनेलिया आणि रितेशचे काही सुंदर न पाहिलेले क्षण देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ज्यात दोघेही रोमान्स करत आहेत. इतर व्हिडिओ प्रमाणे दोघांचा हा सुद्धा व्हिडिओ खूपच गोड आहे. (Kajol Birthday: अजय देवगन ने काजोलला खास ट्विट करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!)
या व्हिडिओसह, रितेशने आपल्या पत्नीसाठी एक खास कॅप्शन देखील लिहिले. रितेश ने लिहिले आहे की, ''देव खरोखर माझ्यावर प्रेम करतो. दररोज सकाळी तुला पाहणे यापेक्षा चांगली भावना असू शकत नाही. 20 वर्षे एकत्र राहिल्यानंतरही असे वाटते की, ही कालचीच गोष्ट आहे. एक उत्तम पार्टनर बनण्यासाठी तुझे आभार. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको. तू प्रत्येक दिवसाबरोबर तरुण दिसू लागली आहेस अस माझ्यासाठी म्हणू शकत नाही. लवकरच लोक म्हणतील की जिनेलियासह हे काका कोण आहेत.''
View this post on Instagram
रितेश च्या या व्हिडिओवर जेनेलियाने ही कमेंट करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. जेनेलियाने लिहिले की ,''सर्वात प्रिय व्यक्ती झाल्याबद्दल धन्यवाद. मी तुला भेटले आणि मला संपूर्ण जग मिळाले. प्रत्येक वर्षी मला स्पेशल फील करण्यासाठी धन्यवाद. मी स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करते.''रितेश आणि जेनेलिया हे बॉलिवूड मधील सर्वांचे आवडते कपल आहे. हे दोघेही सोशल मिडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. रोज नव नवीन व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांचे मनोरंजन ही करत असतात.