Riteish-Genelia Deshmukh यांनी आपल्या मुलांसमवेत घरात राहून हटके अंदाजात दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा, Watch Video
Riteish-Genelia Deshmukh (Photo Credits: Instagram)

आज देशभरात सगळीकडे धुळवडीचा उत्साह दिसत असला तरीही महाराष्ट्रात दरवर्षीप्रमाणे दिसणारी धामधूम यंदा पाहायला मिळाली नाही. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक कठोर निर्बंध घालण्यात आले असून रंगपंचमी (Rangpanchami) खेळण्यावरही बंदी घातली आहे. त्यामुळे लोकांनी घरात राहूनच हा सण साजरा करत आहे. रंगपंचमीच्या दिवशी बॉलिवूड तसेच मराठी कलाकारांची होळी देखील यंदा अनुभवता आली नाही. त्यामुळे बॉलिवूडचे क्युट कपल रितेश आणि जेनेलिया देशमुख (Riteish-Genelia Deshmukh) यांनी घरात राहूनच आपल्या मुलांसोबत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. या संदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख आपली मुले रियान आणि राहील सह चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत आहे. त्यानंतर ते 'बलम पिचकारी' या गाण्यावर थिरकतानाही दिसत आहे.हेदेखील वाचा- Happy Holi 2021: प्रियंका चोप्राने पती निक जोनस आणि कुटूंबासह साजरी केली होळी; पहा खास फोटोज

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

दरवर्षी बॉलिवूडकरांची रंगपंचमी जोरदार पार्टी पाहायला मिळते. यात अनेक सेलिब्रिटीज एकत्र येतात. मुंबईत हा सोहळा रंगतो. मात्र यंदा कोरोनामुळे तशी मजा सेलिब्रिटीजला करता आली नाही. त्यामुळे काहींनी सोशल मिडियावर आपल्या जुन्या रंगपंचमीच्या सेलिब्रेशनचे फोटोज शेअर केले तर काहींनी आपल्या घरातच एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील पती निक जोनस (Nick Jonas) आणि तिच्या कुटुंबीयांसह होळी साजरी करताना दिसली आहे. निक जोनासने आपल्या सोशल मीडियावर प्रियंका चोप्रासोबत होळी साजरी करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना निकने आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.