Riteish Deshmukh (Photo Credits: Instagram)

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवरुन चांगलेच राजकारण रंगले आहे. त्यातच आता बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने 'जय भवानी जय शिवाजी' म्हणत महाराजांचा फोटो ट्विट केला आहे. यावर संमिश्र प्रतिक्रीयांचा वर्षाव  युजर्सकडून केला जात आहे. रितेश याच्या ट्विटखाली शिवाजी महाराजांचा जयघोष करणाऱ्या अनेक कमेंट्स दिसत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. त्यामुळे रितेश देशमुख यांनी माफी मागावी अशा कमेंट्स ट्विटखाली पाहायला मिळत आहेत.

दरम्यान,  22 जुलै रोजी दिल्लीमध्ये राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. त्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली. मात्र यावरुन शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि पुढील वादाला सुरुवात झाली. त्यानंतर आज रितेश देशमुख याने 'जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय !!' असे ट्विट केले आहे. शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी रितेश देखमुख यांनी माफी मागावी अशी मागणी कमेंट्सद्वारे होत आहे. (The Life After Life: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी मृत्यूनंतर अवयव दान करण्याचे घेतला निर्णय; पाहा संपूर्ण व्हिडिओ)

Riteish Deshmukh Tweet:

दरम्यान, राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी केवळ राज्यघटनेतील नियम सांगितले. त्यांचे वर्तन चुकीचे नव्हते. त्यामुळे शिवरायांच्या नावाने राजकारण नको असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. तर व्यंकय्या नायडू यांनी 'मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आणि आई भवानीचा उपासक 'असल्याचे ट्विटद्वारे म्हटले. तसंच मी केवळ सभागृहाचे नियम सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे. मात्र त्यानंतर आज रितेश देशमुख यांचे शिवरायांवरील ट्विट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.