... म्हणून ऋषी कपूरचे केस पांढरे झाले आहेत !
ऋषी कपूर (Photo Credits: Twitter)

कृष्णा कपूरच्या निधनाच्या वेळेस ऋषी कपूर त्यांच्या कुटुंबीयांसह अमेरिकेत होते. त्यांची अनुपस्थिती आणि आजारपण यामुळे सोशलमीडियामध्ये अनेक तर्कवितर्कांना ऊत आला होता. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये केसांचा रंगही अचानक पांढरा झाल्याने पुन्हा नव्याने चर्चा रंगू लागल्या होता. मात्र यामागील कारण ऋषी कपूर यांनी खुद्द ट्विटरच्या माध्यमातून उलगडलं आहे.

ऋषी कपूर यांनी केलेल्या एका ट्विटनुसार, त्यांच्या केसांचा रंग पांढरा होण्यामागे कोणतीही औषधं किंवा उपचारांचा साईड इफेक्ट नसून ते एका भूमिकेसाठी डाय करण्यात आले आहेत. ऋषी कपूर यांनी सिनेमाचं नाव सांगितलं नसलं तरीही चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक खास फोटो शेअर केला आहे. हितेश भाटिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर हनी त्रेहान यांनी निर्मिती केली आहे.

 

29 सप्टेंबरला ऋषी कपूर कुटुंबासह काही वैद्यकीय चाचण्यांसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली बेंद्रे, प्रियांका चोप्राने ऋषी कपूरची भेट घेतली होती.