RIP Vidya Sinha: रजनीगंधा, जानेमन जानेमन.. विद्या सिन्हा यांची ही बॉलिवूडमधील 5 गाणी आजही आहेत लोकांच्या ओठांवर (Watch Video)
Vidya Sinha passes away (Photo Credits: Instagram)

Vidya Sinha Iconic Songs: श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून मागील रविवार मुंबईच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हा (Vidya Sinha) यांचे आज (15 ऑगस्ट) निधन झाले. मुंबईतील जुहू भागात असलेल्या क्रिटीकेअर (Criticare Hospital) हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान फुफ्फुसं आणि हृद्य कमकूवत झाल्याने वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र एकेकाळी बॉलिवूडच्या 1970, 80 च्या काळात त्यांनी वठावलेल्या दर्जेदार भूमिका आजही भारतीय सिनेरसिकांच्या मनात खास जागा करून आहे. काव्यांजली, कबुल है, इश्क का रंग सफेद या हिंदी मालिकांमधील विद्या सिन्हा यांचे काम विशेष गाजलं.

रजनीगंधा , पती, पत्नी और वो ते अगदी शेवटच्या काळात बॉडीगार्ड सारख्या सिनेमात काम करणार्‍या विद्या सिन्हा यांची काही गाणी अजरामर ठरली आहेत. बॉलिवूडच्या या सदाबहार गाण्यांनी पुन्हा पहा विद्या सिन्हा यांची एक झलक

रजनीगंधा

जानेमन जानेमन 

जीना भी  क्या जीना  

थंडे थंडे पानी से

विद्या सिन्हा यांचा जन्म मुंबईत 15 नोव्हेंबर 1947 साली झाला. मॉडेल म्हणून विद्या सिन्हा या क्षेत्रात आल्या. त्यांनी Miss Bombay contest चं विजेतेपद मिळवलं. त्यानंतर प्रसिद्ध सिने निर्माते बसु चॅटर्जी यांनी विद्या सिन्हा यांच्यामधील चमक ओळखून काम दिले. लग्नानंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश करूनही त्यांनी आपली खास ओळख बनवली.