Richard Gere Kissing Case: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि हॉलिवूड स्टार रिचर्ड गेरे (Richard Gere) यांच्या चुंबन प्रकरणाची तुम्हाला माहिती असेलच? 2007 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान रिचर्ड गेरेने शिल्पा शेट्टीला सार्वजनिकपणे किस केले होते. या प्रकरणी लोकांनी दोघांवरही टीका केली. इतकेच नाही तर अभिनेत्रीवर अनेक एफआयआर दाखल करण्यात आले असून तिच्यावर अश्लीलतेचा आरोप करण्यात आला आहे. पण, शिल्पा शेट्टीला आता या जुन्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, 2007 मध्ये रिचर्ड गेरे आणि शिल्पा शेट्टी चुंबन प्रकरणात शिल्पा शेट्टीविरुद्ध अश्लीलतेचा कोणताही पुरावा नसल्याचे मुंबई न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टाने असेही म्हटले आहे की, अभिनेत्रीने चुंबन घेतले नव्हते, उलट तिचे चुंबन घेतले गेले होते. त्यामुळे ती त्यात सहभागी नव्हती. (हेही वाचा -Salman Khan Death Threats: सलमान खानला ला 30 एप्रिल ला ठार मारण्याचा Mumbai Police पोलिसांना राजस्थान मधून फोन कॉल; अधिक तपास सुरू)
न्यायालयाने म्हटले आहे की, 'रस्त्यावर किंवा सार्वजनिक वाहतुकीवर किंवा अशा कोणत्याही प्रकरणात महिलेचा विनयभंग झाला असेल तर तिला सहभागी म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. अशा प्रकरणांमध्ये तक्रार न केल्याने महिलेवर कारवाई होऊ शकत नाही.'
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. जाधव यांनी गेल्या आठवड्यात शिल्पा शेट्टीला दोषमुक्त करण्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश कायम ठेवला, कारण तिच्याकडून अश्लीलता दिसून येत नाही. या संदर्भातील सविस्तर आदेश आज (मंगळवारी) उपलब्ध करून देण्यात आला.
2007 मध्ये शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेरे यांनी एड्स जनजागृती कार्यक्रमात भाग घेतला होता. यादरम्यान गेरे यांनी सार्वजनिक व्यासपीठावर शिल्पा शेट्टीचे चुंबन घेतले. सध्या अभिनेत्रीला दिलासा मिळाला आहे.