सुपरहीट ठरणाऱ्या चित्रपटांसोबतच त्यातील भूमिकाही अजरामर होतात. कधी कधी ती भूमिका निभवण्यासाठीच त्या कलाकाराचा जन्म झाला असावा असे वाटते. म्हणूनच ज्या कलाकाराने ती भूमिका साकारली आहे त्या कलाकाराशिवाय दुसरा कोणीच त्या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही असे आपले ठाम मतही बनते. मात्र चित्रपटसृष्टीत अशा काही महत्वाच्या भूमिका आहे ज्या आधी कोण्या दुसऱ्या कलाकाराला ऑफर झाल्या होत्या, मात्र योगायोगानेच अशा भूमिका ज्या कलाकारांच्या पदरात पडली त्यांनी त्याचे सोने केले. चला तर पाहूया आशा कोणत्या भूमिका आहेत ज्या नाकारल्याने कलाकारांवर पश्चाताप करण्याची वेळ आली.
जेनेलिया डिसोझा – प्राची देसाई (बोल बच्चन)
रोहित शेट्टीचा १०० करोड टप्पा पार करणारा एक महत्वाचा चित्रपट ‘बोलबच्चन’. या चित्रपटाने रोहित शेट्टी सोबतच प्राची देसाईलाही एक नवीन ओळख मिळवून दिली. मात्र या चित्रपटातील प्राची देसाईची भूमिका आधी जेनेलिया डिसोझाला ऑफर झाली होती. त्याचवेळी जेनेलियाने नवदीप सिंघचा एक चित्रपट आधीच साईन केल्याने तिच्याकडे बोलबच्चनसाठी वेळ नव्हता त्यामुळे जेनेलियाने हा चित्रपट नाकारला.
ऐश्वर्या राय – राणी मुखर्जी (चलते चलते)
शाहरुख खान-जुही चावला निर्मित चलते चलतेसाठी सुरुवातीला ऐश्वर्याला कास्ट केले होते. शाहरुखने ऐश्वर्यासोबत चित्रपटाचा बराचसा भाग शूटही केला होता. मात्र एकदा सलमानने दारू पिऊन चलते चलतेच्या सेट वर बराच गोंधळ घातला, त्यामुळे शाहरुखला नाईलाजाने ऐश्वर्या ऐवजी राणीला घेऊन हा चित्रपट पूर्ण करावा लागला.
करीना कपूर – अमिषा पटेल (कहो ना प्यार है)
करीना कपूर आपले बॉलिवूडमधील पदार्पण कहो ना प्यार है चित्रपटाद्वारे करणार होती. करीनाने चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवातही केली मात्र काही दिवसांनी तिच्या लक्षात आले की, चित्रपटाचा बराचसा फोकस हा रितिक रोशनवरच आहे. ही तिची डेब्यू फिल्म असल्याने घाबरून करीनाने हा चित्रपट सोडला, जो पुढे जाऊन ऑफर झाला अमिषा पटेलला. नंतर रीफ्युजीमधून बेबोने तिचा डेब्यू केला जो की सुपरर्फ्लोप चित्रपट ठरला.
करीना कपूर – प्रिती झिंटा (कल हो ना हो)
कल हो ना होसाठी करण जोहरची पहिली पसंती होती करीना कपूरला. मात्र करीनाने मोठ्या रकमेची मागणी केल्याने कारण जोहरला नाईलाज म्हणून प्रितीला घ्यावे लागले. आश्चर्य म्हणजे हा चित्रपट सुपरहीट ठरून इथूनच प्रितीच्या करिअरची वाढ सुरु झाली.
अम्रिता राव – स्वरा भास्कर (प्रेम रतन धन पायो)
प्रेम रतन धन पायोमध्ये सलमानच्या बहिणीच्या भूमिकेसाठी आधी संस्कारी मुलगी अम्रिता रावला विचारणा झाली होती, मात्र अम्रिताने सलमानच्या बहिणीचा रोल करण्यास नकार दिला, जी पुढे स्वरा भास्करला मिळाली.
प्रियंका चोप्रा – असीन (गजीनी)
हिंदीमध्ये १०० करोडचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट गजीनी, ज्यामधील आमीरचा लूक आणि असीनच्या भूमिकेचे फारच कौतुक झाले. सुरुवातीला ही कल्पनाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती ती प्रियंका चोप्राला. प्रियंकाला ही भूमिका तितकीशी दमदार न वाटल्याने तिने ही भूमिका सपशेल नाकारली. त्यामुळे मूळ तमिळ गजीनीमधील असीनच्याच नावाचा हिंदीसाठेही विचार झाला.
करीना कपूर – दीपिका पदुकोन (रामलीला)
रामलीलामधील दीपिका रणवीरची केमिस्ट्री पेक्षकांना चांगलीच भावली. मात्र दीपिका आधी हा चित्रपट साईन केला होता करीनाने. मात्र नंतर तिने आपल विचार बदलला आणि या चित्रपटातून काढता पाय घेतला.
कंगना राणावत – विद्या बालन (डर्टी पिक्चर)
विद्या बालनच्या करिअरमधील सर्वात महत्वाचा चित्रपट म्हणून डर्टी पिक्चर कडे पाहता येईल. मात्र या चित्रपटासाठी आधी कंगनाला विचारण्यात आले होते, मात्र कंगनाने डर्टी पिक्चर ऐवजी तनु वेडस मनूला पसंती दिली.
जुही चावला – करिष्मा कपूर (दिल तो पागल है)
शाहरुखच्या दिल तो पागल हैमधील निशाच्या भूमिकेसाठी करिष्माची निवड होण्याआधी जुही चावला, मनीषा कोईराला, रविना टंडन, शिल्पा शेट्टी, उर्मिला, काजोल अशा अनेकांना विचारणा झाली होती.