दीपिका पादुकोण चा लाल रंगाच्या ड्रेस मधील 'Red Hot' फोटो पाहून पती रणवीर सिंह दिली अशी रोमँटिक कमेंट
Deepika Padukone (Photo Credits: Instagram)

तरुणाईमध्ये सर्वात लोकप्रिय असलेली बॉलिवूडमधील सर्वात हॉट जोडी म्हणजे दीपवीर. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे दोघेही आपले एकमेकांवर असलेले अतोनात प्रेम व्यक्त करण्यास कधीच मागे हटत नाही. मग तो एखादा पुरस्कार सोहळा असू दे, मुलाखत असून किंवा सोशल मिडिया. सोशल मिडियावरही हे दोघे बरेच सक्रिय असल्या कारणाने ते एकमेकांना खूप छान रित्या फॉलो देखील करतात आणि त्यांच्या प्रत्येक पोस्टला ते एकमेकांना कमेंट करतात. नुकताच दिपिका आपल्या लाल रंगाच्या ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत 17 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

या फोटोमध्ये दीपिका ने लाल रंगाचा गाऊन परिधान केला असून त्यात ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

हेदेखील वाचा - '83' चित्रपटाच्या सेटवर दीपिका ने रणवीरला दिला बॅट ने चोप, पाहा व्हिडियो

'लाल रंग हा लोकांना भुकेला बनवणारा, आकर्षित करणारा, उत्साहित करणारा असतो. या सर्व गोष्टी मी आज करत आहे; असे दीपिकाने या फोटोखाली म्हटले आहे. यावर कमेंट करत तिच्या पतीने म्हणजे अभिनेता रणवीर सिंह ने 'या सर्व गोष्टी तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी अनुभवत आहे', अशी क्युट प्रतिक्रिया रणवीर सिंह ने दिली आहे.