व्हिडिओ:  रणवीर सिंह याने करीनाकडे मागितल्या टीप्स म्हणाला 'टॉप पती कसे व्हायचे सांग ना'
Ranveer Singh, Kareena Kapoor,Deepika Padukone | (Photo Credits- File photo for representation only)

अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या 'गुड न्यूज' या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. आपल्या व्यग्र कार्यक्रमातून काहीसा वेळ काढत ती एक रोडियो शो होस्ट करत आहे. ज्यात अनेक सेलिब्रेटी मंडळी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त करतात. करनाने विचारलेल्या काही प्रश्नांना हजरजबाबी उत्तरे देतात. दरम्यान, अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने करीनाला एक हटके प्रश्न विचारला. रणवीरचा प्रश्न पाहून त्याने करीनाकडे एक नाजूक प्रश्न सोडविण्यासाठी जणू टीप्सच माहगितल्या अशी चर्चा दोघांच्या चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.

एका व्हिडिओच्या माध्यमातून रणवीर सिंह याने करीना कपूर हिच्याशी संपर्क केला. व्हिडओच्या माध्यमातून रणवीर करीनाला म्हणाला की, तू मला तुझ्या शोमध्ये आतापर्यंत का नाही बोलवलेस. याच वेळी त्याने करीनाला एक प्रश्नही विचारला, 'तू मला सांगू शकते का की, चांगला पती (टॉप पती) कसा होता येईल? यावर करीनाने मोठे मजेशीर उत्तर दिले. उत्तर पाहण्यासाठी खाली व्हिडिओवर क्लिक करा. (हेही वाचा, बेबी बंप दिसूनही अभिनेत्री करीना कपूर प्रेग्नंट नाही; जाणून घ्या Viral फोटोमागचे सत्य)

रणवीर सिंह यांच्या प्रश्नाला उत्तर देताना करीनाने सांगितले की, त्यासाठी टीप्सची काहीच आवश्यकता नाही. कारण, सर्वांनाच माहिती आहे की, तू दीपिकावर किती प्रेम करतोस. तुम्हा दोघांची केमेस्ट्रीही लोकांना फार आवडते. तुम्हाला पाहून लोक खूश होतात. असे असले तरी, करीनाने रणविर याला काही टीप्स दिल्याच. ती म्हणाली पती पत्नीचे नाते अधिक दृढ करण्यासाठी एकमेकांना स्पेस देणे गरजेचे आहे. त्यामुळे आयुष्यातील सर्व गोष्टी सोप्या होऊन जातात.