Ranu Mandal New Project: अभिनेत्री दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia) सरोजिनी (Sarojini) या चित्रपटामुळे खूपचं चर्चेत आली आहे. हा एक बायोपिक चित्रपट आहे. या चित्रपटात ती सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटासाठी रानू मंडल गाणी गाणार आहेत. दीपिकाने याबाबत आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये दीपिकाने लिहिले आहे की, 'माझा चित्रपट...सरोजिनी...मध्ये रानू मंडल धीरज मिश्रा यांनी लिहिलेली गाणी गाणार आहेत.' ही पोस्ट शेअर करताना दीपिकाने रानू मंडल यांचा यासंदर्भातील व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रानू मंडल सांगत आहेत की, मी धीरज मिश्रासोबत काम करत आहे. मी सरोजिनी चित्रपटातील सर्व गाणी गाणार आहे. मला आशा आहे की, तुम्ही मला यापूर्वी जसं प्रेम आणि आदर दिला, तसाच तो कायम राहिल. (हेही वाचा - Ganpath Part 1: 'गणपत' सिनेमाच्या टीझर पोस्टरवर टायगर श्रॉफ याचा दमदार अंदाज (Watch Video))
दरम्यान, IndiaToday.in शी बोलताना दीपिकाने या चित्रपटाविषयी सांगितले होते की, 'मला सरोजिनी नायडू यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची ऑफर देण्यात आली आहे. परंतु, मी अद्याप या प्रोजेक्टवर साइन केलेलं नाही. या चित्रपटाचे लेखन धीरज मिश्रा यांनी केले असून तेच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. पण लॉकडाऊनमुळे धीरजने अजून मला कथा ऐकवलेली नाही. जेव्हा लॉकडाउन संपेल, तेव्हा आम्ही कथेच्या सेशनसाठी एकत्र बसू. जर सर्व काही ठीक असेल, तर मी हा चित्रपट करण्याच्या विचारात आहे,' असंही दीपिकाने त्यावेळी म्हटलं होतं.
My movie ....Sarojini ...written by Dhiraj Mishra songs to be sung by ranu Mandal @DhirajM61408582 pic.twitter.com/a6TpbrfT7G
— Dipika Chikhlia Topiwala (@ChikhliaDipika) November 10, 2020
रेल्वे स्थानकात रानू मंडल यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या देशभरात प्रसिद्ध झाल्या होत्या. या व्हिडिओमुळे रानू मंडळ केवळ एका रात्रीत स्टार बनल्या होत्या. लता मंगेशकर यांच्या प्यार का नगमा हे गाण गाऊन रानू मंडलने लोकप्रियता मिळविली. यानंतर हिमेश रेशमियाने त्यांना गाण्याची संधी दिली. त्यानंतर रानूने हिमेशबरोबर गाणे गायले. आज रानू मंडल एक प्रसिद्ध नाव झालं आहे.