Ganpath Part 1: 'गणपत' सिनेमाच्या टीझर पोस्टरवर टायगर श्रॉफ याचा दमदार अंदाज (Watch Video)
Ganpath Poster Starring Tiger Shroff (Pic Credit: Twitter)

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याचा नवा सिनेमा 'गणपत' (Ganapath) चे धमाकेदार पोस्टर काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. पोस्टर रिलीजनंतर सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्यातच आता या सिनेमाचे टीझर पोस्टर समोर येत आहे. या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ पुन्हा एकदा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. यात टायगर श्रॉफचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. विशेष म्हणजे यात टायगरचा एक जबरदस्त डायलॉग देखील ऐकायला मिळत आहे. तो म्हणतो, "आपनु डरता है ना तो आपनु बहुत मारता है."

टायगर श्रॉफचे गणपत सिनेमातील नवे टीझर पोस्टर निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे शेअर करताना त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "गणपत जेव्हा येतो तेव्हा धम्माल उडवून देतो. पहा गणपतचा शानदार लूक." (Ganapath Part-1 Poster: टायगर श्रॉफ च्या 'गणपत पार्ट-1' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; पहा थ्रिलर अॅक्शन)

पहा टीजर पोस्टर:

हा सिनेमा टायगर श्रॉफ याच्या दुसऱ्या सिनेमांपेक्षा अगदी वेगळा आहे. त्यामुळेच या सिनेमाचा भाग असल्याने टायगर श्रॉफ अत्यंत आनंदी आहे. या सिनेमाच्या माध्यमातून टायगर पहिल्यांदाच जॅकी आणि विकास बहल सोबत काम करणार आहे. दरम्यान, या टीमसोबत काम करताना आनंद होत असल्याचे टायगरने सांगितले आहे.

टायगरच्या या सिनेमाचे शूटींग 2021 पासून सुरु होईल. मात्र हा सिनेमा नेमका कधी प्रदर्शित होणार याबद्दल माहिती मिळालेली नाही. या सिनेमाचे दिग्दर्शन विकास बहल करत आहेत.