Ganapath Part-1 Poster (PC - Twitter)

Ganapath Part-1 Poster: बॉलिवूडच्या स्टार किड्स टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ने चित्रपटसृष्टीत स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये असे खूपं कमी स्टार आहेत, ज्यांच्यात जबरदस्त अॅक्शन करण्याचं धाडस आहे. टायगर श्रॉफने आतापर्यंत अनेक अॅक्शन थ्रिलर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले. अॅक्शन शिवाय टायगर श्रॉफचे डान्स कौशल्य पाहण्यासारखे आहे. नुकतचं टायगरने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करत 'गणपत-भाग 1' चे मोशन पोस्टर (Ganapath Part-1 Poster) शेअर केले आहे. या मोशन पोस्टवरून हा एक थ्रिलर चित्रपट असणार असल्याचं समजत आहे. टायगरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 'गणपत-भाग 1' चे मोशन पोस्टर शेअर करताना म्हटलं आहे की, 'हे माझ्यासाठी आणि विशेषतः आपल्यासाठी खास आहे. मी गणपतची भूमिका सादर करत आहे. अॅक्शन, साहस आणि करमणुकीसाठी सज्ज व्हा.' मोशन पोस्टरवरील माहितीनुसार, हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करीत आहेत. हा त्यांचा पहिलीच अ‍ॅक्शन सिनेमा असणार आहे. गणपत चित्रपटाची निर्मिती या वासु भगनानी आणि जॅकी भगनानी यांची कंपनी पूजा फिल्म्स करत आहे. (हेही वाचा - Motion poster of Tiger Shroff's Ganapat Part-1 Movies screened Watch Thriller Action)

दरम्यान, टायगरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये उध्वस्त झालेल्या उंच इमारती दिसत आहे. यात एका ढिगाऱ्यावर एक आकृती दिसते. ही आकृती टायगरची असून त्याची पाठ यात पाहायला मिळत आहे. यात टायगरचा आवाज ऐकायला मिळत आहे. 'जेव्हा मला भीती वाटते, तेव्ही मी खूप मारतो,' असं टायगर म्हणत आहे.

नुकतचं टायगर श्रॉफच्या आणखी दोन अ‍ॅक्शन चित्रपटांची घोषणा झाली आहे. याती एक म्हणजे 'हीरोपंती 2' आणि दुसरा म्हणजे 'बागी 4'. हे दोन्ही चित्रपट टायगरच्या चित्रपटांची फ्रॅंचायझी आहेत. टायगरने हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात टायगरसोबत तारा सुतारिया मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यानंतर, टायगर श्रॉफ बागी 4 चे शुटिंग सुरू करण्याची शक्यता आहे. हे दोन्ही चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करीत आहेत.