गेल्या काही दिवसात बॉलिवूडचे (Bollywood) सिनेमे धडाधड आपटत आहे. एवढचं नाही तर मोठमोठ्या कलाकारांना ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागत आहे. अनेक सिनेमे बॉयकॉट (Boycott) करण्याचा ट्रेन्ड (Trenda) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) सुरु आहे. तरी अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ब्रम्हास्त्रने मात्र आपलं नाविण्य दर्शवत एक नवा रेकॉर्ड (Record) आपल्या नावी नोंदवला आहे. तो म्हणजे चित्रपट (movie) प्रदर्शित होण्यापुर्वीच (Before Release) या चित्रपटाटी अॅडव्हान्स बुकींग (Advance Booking) सुरु करण्यात आली आहे. अॅडव्हान्स बुकींगमध्ये (Advance Booking) ब्रम्हास्त्रने भारतातील बॉलिवूड (Bollywood), हॉलिवूडसह (Bollywood) दक्षिणात्य (South Cinemas) सिनेमाचे जवळजवळ सगळे रेकॉर्ड (Record) तोडत एक नवा रेकॉर्ड आपल्या नावी नोंदवला आहे. तरी अॅडव्हान्स बुकीमध्ये बोलबोला करणारा रणबीरचा हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर काय जादू करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'ब्रह्मास्त्र'ने 'RRR (हिंदी)' आणि 'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa)ला जवळपास अडीच दिवसात PVR चेन प्रॉपर्टीजमध्ये मात दिली आहे. तरी दिग्दर्शक अयान मुखर्जीसह (Aayan Mukherjee) संपूर्ण बॉलिवूडला (Bollywood) या सिनेमाकडून (Movie) मोठ्या अपेक्षा आहेत. कारण गेल्या काही दिवसात बॉलिवूडच्या सिनेमांची अवस्था बघता आता रणबीरचा (Ranbir Kapoor) हा अनोखा सिनेमा बॉलिवूडला (Bollywood) या बॉयकॉट ट्रेन्डमधून (Boycott) बाहेर काढण्याची शक्यता आहे. तरी अवघ्या दोन दिवसांनंतर म्हणजे 9 सप्टेंबरला ब्रम्हास्त्र (Bramhastra) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. (हे ही वाचा:- Athiya Shetty आणि KL Rahul यांच्या लग्नाची तयारी सुरु; खंडाळ्यात Suniel Shetty च्या घरी बांधणार लग्नगाठ- Reports)
'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा अयान मुखर्जीने(Aayan Mukherjee) दिग्दर्शित केला असुन यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachachan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), मौनी रॉय (Mouni Roy), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि दक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुना (Nagarjuna) मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. इंडियन मायथलॉजीचा (Indian Mythlogy) संबंधी साधत हा सिनेमा प्रदर्शित केला असुन या सिनेमाचे पुढील भाग येणार असल्याची ही चर्चा सिनेजगात आहे.