Deepika Ranveer Wedding: दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली
रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचे स्टार कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा विवाहसोहळा 14-15 नोव्हेंबरला पार पडला. यांच्या लग्नाच्या फोटोची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. काल रात्री दीपिका-रणवीरचे वेडिंग फोटोज समोर आले. त्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीर कपूरवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरची फोटोजच्या माध्यमातून जबरदस्त खिल्ली उडवली. दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो

रणबीर कपूरची खिल्ली उडवणारे अनेक ट्विट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. काही फोटोज शेअर करत युजर्सने लिहिले की, दीपवीरच्या लग्नात रणबीर कपूर या काही खास अंदाजात दिसला.

दीपवीरच्या लग्नामुळे रणबीर कपूर ट्रोल होणे अत्यंत स्वाभाविक आहे. हे फोटोज सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहेत.

दीपिका रणवीरने 14 नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने आणि 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने विवाह केला. सुमारे 5 वर्षांहून अधिक काळ रिलेशनशीपनंतर ही जोडी विवाहबंधनात अडकली. मुंबईमध्ये येत्या 28 नोव्हेंबरला तर बेंगलोरमध्ये 21 नोव्हेंबारला दीप वीर च्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.